• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

मोटारी आणि वायर चोऱ्यांमुळे शेतकरी त्रस्त जि.प. सदस्य सुनील बनसोडे यांचे थेट पोलिसांना निवेदन

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 6, 2026
in क्राईम
0
मोटारी आणि वायर चोऱ्यांमुळे शेतकरी त्रस्त जि.प. सदस्य सुनील बनसोडे यांचे थेट पोलिसांना निवेदन
0
SHARES
279
VIEWS

मोटारी आणि वायर चोऱ्यांमुळे शेतकरी त्रस्त जि.प. सदस्य सुनील बनसोडे यांचे थेट पोलिसांना निवेदन

नळदुर्ग प्रतिनिधी. अझहर शेख

तुळजापूर तालुक्यातील शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघातून एक धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील तब्बल २० ते २२ गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याच्या मोटारी आणि विद्युत वायरच्या चोऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे आधीच संकटात असलेला बळीराजा पुरता हवालदील झाला असून, पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

या गंभीर समस्येची दखल घेत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य सुनील नामदेव बनसोडे यांनी थेट पोलीस प्रशासनाला ललकारले असून नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना कायदेशीर कारवाईसाठी अधिकृत पत्र दिले आहे.सुनील बनसोडे यांनी आपल्या पत्रात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मतदारसंघात सातत्याने होणाऱ्या या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. विहिरी आणि तलावावर असणाऱ्या मोटारी रात्रीच्या वेळी लंपास केल्या जात आहेत. पोलिसांनी तातडीने या चोरट्यांचा बंदोबस्त करून त्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी जाहीर मागणी त्यांनी केली आहे. मतदारसंघातील खालील गावांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे:
दिधेंगाव, अरबळी, येवती, चिवरी (उ), शिरगापूर, बाभळगाव, इटकळ, केशेगाव, निलेगाव, देवसिंगा (नळ), गुळहाळी, शहापूर, सराटी, हिप्परगा ताड, फुलवाडी, केरूर.यापूर्वी ज्यांच्यावर अशा चोऱ्यांचे गुन्हे दाखल आहेत, त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून कडक समज देण्यात यावी आणि रात्रीची गस्त वाढवण्यात यावी,” अशी आग्रही मागणी बनसोडे यांनी केली आहे.
या सदरील निवेदनाची प्रत गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री धाराशिव, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक धाराशिव यांनाही पाठवल्या असून, जर पोलिसांनी यावर तातडीने कारवाई केली नाही, तर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी तीव्र भूमिका घेतली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. आता यावर नळदुर्ग पोलीस काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट असून, तातडीने गस्त वाढवून चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी जोर धरत आहे.


लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashiv osmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादजिल्हा परिषदतुळजापूर विधानसभा आमदार राणाजगजितसिंह पाटीलधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनळदुर्गपोलिस स्टेशन नळदुर्ग
Previous Post

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई आठवडी बाजार परिसरातून चोरीच्या मोटारसायकलसह आरोपी जेरबंद

Next Post

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर धडक कारवाई

Related Posts

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला
क्राईम

मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

September 24, 2026
बसस्थानकात पोलिसाच्याच खिशावर डल्ला;
क्राईम

बसस्थानकात पोलिसाच्याच खिशावर डल्ला;

September 24, 2026
Next Post
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर धडक कारवाई

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर धडक कारवाई

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!