• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

खोटी ओळख, अत्याचार व ब्लॅकमेल प्रकरण; धाराशिव जिल्ह्यातील वादग्रस्त कला केंद्रे पुन्हा चर्चेत

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 9, 2026
in क्राईम
0
खोटी ओळख, अत्याचार व ब्लॅकमेल प्रकरण; धाराशिव जिल्ह्यातील वादग्रस्त कला केंद्रे पुन्हा चर्चेत
0
SHARES
133
VIEWS

खोटी ओळख, अत्याचार व ब्लॅकमेल प्रकरण; धाराशिव जिल्ह्यातील वादग्रस्त कला केंद्रे पुन्हा चर्चेत

धाराशिव लोकविचार

एका विवाहित महिलेची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार, ब्लॅकमेल, जबरदस्तीने विवाह तसेच विविध कला केंद्रांमध्ये काम करण्यास भाग पाडल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे धाराशिव, बीड, संभाजीनगर, वाशीम आणि नांदेड जिल्ह्यातील काही कला केंद्रांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.तक्रारदार महिलेच्या माहितीनुसार, कौटुंबिक वादानंतर ती आई-वडील व मुलांसह २०२३ मध्ये पुणे येथे कामासाठी गेली होती. शिक्रापूर येथे एका कंपनीत काम करत असताना मुस्कान नावाच्या महिलेची तिची ओळख झाली. अधिक पैसे मिळतील असे सांगून तिला धाराशिव येथील गौरी कला केंद्रात नेण्यात आले. तेथे अर्चना नावाच्या महिलेच्या पार्टीत तिला नाच करण्यास सांगण्यात आले. याच ठिकाणी इतर काही मुलींनाही आणण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.कला केंद्रात काम करत असताना एका व्यक्तीने स्वतःचे नाव “राजू” असे सांगून तिच्याशी ओळख वाढवली. पुढे त्याने कळंब येथील प्रेरणा लॉजसह विविध ठिकाणी नेऊन तिच्याशी संबंध ठेवले व फोटो-व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. त्यानंतर लग्नासाठी दबाव टाकत धमक्या दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.नंतर संबंधित व्यक्तीचे नाव सर्फराज अलीम मोमीन असल्याचे समोर आले. तो कळंब येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तक्रारीनुसार, महिलेला वारंवार मारहाण, शिवीगाळ व मानसिक त्रास देण्यात आला. तिच्या हातावर जबरदस्तीने टॅटू काढण्यात आला तसेच तिच्यावर दबाव टाकून राहणीमान बदलण्यास भाग पाडल्याचाही आरोप करण्यात आला आहे.महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिला बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा येथील जगदंबा कला केंद्र, त्यानंतर महाकाली कला केंद्र तसेच संभाजीनगर येथील थापीदंडा कला केंद्र येथे नेले. त्या ठिकाणी मारहाण करून काम करण्यास भाग पाडण्यात येत असल्याचा आरोप आहे. पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतरही तिला परत आणून मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.एका घटनेत तलवारीसारख्या शस्त्राने हल्ला करण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप असून त्यात तिच्या मैत्रिणीला दुखापत झाल्याचे म्हटले आहे. पुढे ती लातूर, लोहा आणि पुणे येथे गेल्यानंतरही आरोपीकडून पाठलाग व धमक्या दिल्या गेल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 351(2), 352, 64 आणि 64(2)(m) अंतर्गत पुणे शहरातील खडक पोलीस ठाण्यात झिरो नंबरने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी प्रकरण धाराशिव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील अनेक कला केंद्रे बंद झाली असली तरी तेथील महिलांवरील कथित अत्याचार आणि गैरप्रकारांची प्रकरणे आता समोर येऊ लागल्याने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

सीएनजी तुटवड्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लागल्या रांगा !अपघाताचा धोका वाढला अन् प्रशासनाचे दुर्लक्ष

Next Post

“आपला धाराशिव कसा आहे?” बदलीनंतरही नाळ जपणारे आयपीएस अधिकारी अतुल कुलकर्णी; सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनुभव 

Related Posts

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ
क्राईम

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
क्राईम

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;
क्राईम

मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;

August 25, 2026
चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

August 25, 2026
गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे
क्राईम

गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे

August 24, 2026
नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ
क्राईम

नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ

August 24, 2026
Next Post
“आपला धाराशिव कसा आहे?” बदलीनंतरही नाळ जपणारे आयपीएस अधिकारी अतुल कुलकर्णी; सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनुभव 

“आपला धाराशिव कसा आहे?” बदलीनंतरही नाळ जपणारे आयपीएस अधिकारी अतुल कुलकर्णी; सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनुभव 

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!