• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

बौद्ध युवकास रस्त्यात अडवून लोखंडी गज व दगडाने डोके फोडलेॲट्रॉसिटी दाखल, मात्र १३ दिवसांपासून आरोपी मोकाट

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 5, 2026
in क्राईम
0
बौद्ध युवकास रस्त्यात अडवून लोखंडी गज व दगडाने डोके फोडलेॲट्रॉसिटी दाखल, मात्र १३ दिवसांपासून आरोपी मोकाट
0
SHARES
62
VIEWS

बौद्ध युवकास रस्त्यात अडवून लोखंडी गज व दगडाने डोके फोडलेॲट्रॉसिटी दाखल, मात्र १३ दिवसांपासून आरोपी मोकाट

धाराशिव – लोकविचार

वाशी तालुक्यातील पिंपळगाव लिंगी येथे एक संतापजनक आणि धक्कादायक घटना घडली असून, एका बौद्ध युवकाला रस्त्यात अडवून जातीवाचक शिवीगाळ करत लोखंडी गजाने, दगडाने व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करुन डोके फोडले आहे. तसेच डोक्यासह पाठीत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात ॲट्रॉसिटी अर्थात अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होऊन १३ दिवसांचा कालावधी लोटला असून पोलिसांनी आरोपीला अभय दिल्यामुळे ते गावात मोकाट फिरत आहेत. दरम्यान, आरोपींना तात्काळ अटक न केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, वाशी तालुक्यातील लिंगी पिंपळगाव येथील भिम सज्जन गाडे (वय २२ वर्षे) हे दि.२२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ते शेतातून घरी परतत असताना सैलानी बाबा मंदिराजवळ अचानक महेश दिनेश वाघमारे, त्याचा मामा तसेच एक अनोळखी व्यक्ती अशा तिघांनी एका मोटारसायकलवर पाठलाग केला. महेश वाघमारे हा मोटारसायकल चालवत होता. तर त्याच्या सोबत त्याचा मामा व एक अनोळखी व्यक्ती बसलेले होते. या तिघांनी भिम गाडे यांना विनाकारण जबरदस्तीने पकडून त्यांच्या शर्टाला ओढत तानाजी निरगुडे यांच्या शेताजवळील ‘शेतकरी राजा’ हॉटेलपर्यंत फरफटत नेले. तेथे पोहोचताच महेश वाघमारे याने जातीवाचक शिवीगाळ” करीत त्या तिघांनी गाडे यांना लोखंडी गज, दगड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम अमानुषपणे मारहाण केली. त्यामुळे रक्तबंबाळ होऊन त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस व पाठीत मोठी जखम झाली आहे. त्या तिघांच्या तावडीतून आपली कशीबशी सुटका करून गाडे यांनी उसाच्या शेतात लपून आपला जीव वाचवला. मात्र, उसात जात असताना महेश वाघमारेने “तुला जिवंत सोडणार नाही” अशी जिवे मारण्याची धमकी दिली. उसाच्या शेतातून गाडे यांनी आपल्या भावाला फोन करून बोलावून घेतले. त्यांचा भाऊ घटनास्थळी आल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत गाडे यांना वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केले. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात महेश दिनेश वाघमारे, त्याचा मामा व एक अनोळखी इसम यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ – ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५१ (३), ३५२, ३ (५), अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, १८८९, ३ (१) (आर), ३ (१) (एस), ३ (२) (va) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊन तेरा दिवसाचा कालावधी लोटला असून अद्यापही आरोपींना अटक केले नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जर आरोपींना अटक केले नाही तर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadआमदार कैलास पाटीलधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

नळदुर्गकरांना मोठा दिलासा! २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे होणार नियमित!

Next Post

बोरफळ रस्त्याचा ‘मृत्यू सापळा’ ठरला घातक; अपूर्ण पुल, संथ गतीने काम, सुरक्षा नाही… निष्पाप एकुलत्या एक मुलाचा जागीच मृत्यू – ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post
बोरफळ रस्त्याचा ‘मृत्यू सापळा’ ठरला घातक; अपूर्ण पुल, संथ गतीने काम, सुरक्षा नाही… निष्पाप एकुलत्या एक मुलाचा जागीच मृत्यू – ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!

बोरफळ रस्त्याचा ‘मृत्यू सापळा’ ठरला घातक; अपूर्ण पुल, संथ गतीने काम, सुरक्षा नाही… निष्पाप एकुलत्या एक मुलाचा जागीच मृत्यू – ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!