तुळजापूर खून प्रकरणात दोन्ही आरोपी निर्दोष मुक्त ॲड. विशाल साखरे यांच्या युक्तिवादाला यश
पंचनामा, तपासातील त्रुटी आणि प्रत्यक्षदर्शी पुराव्यांचा अभाव ठरला निर्णायक; ॲड. विशाल साखरे यांच्या युक्तिवादाला यश
तुळजापूर लोकविचार
तुळजापूर पोलीस ठाणे हद्दीतील बहुचर्चित खून प्रकरणात न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. गुन्हा रजिस्टर क्रमांक ११३/२०२१ व सेशन केस क्रमांक ५७/२०२१ मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, २०१, १२०(ब) सह ३४ अन्वये आरोप ठेवण्यात आले होते.
आरोपींच्या वतीने ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी प्रभावी युक्तिवाद करताना प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा अभाव, फिर्यादीने घटना प्रत्यक्ष पाहिली नसणे, पंचनाम्यांमधील त्रुटी तसेच तपासातील विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.
वैद्यकीय व फॉरेन्सिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब, डॉग स्क्वॉडच्या कार्यवाहीसह तपासी अधिकाऱ्यांच्या तपासातील त्रुटींचाही बचाव पक्षाने ऊहापोह केला. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींविरुद्धचा गुन्हा संशयाच्या पलीकडे सिद्ध होत नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
सुमारे पाच वर्षे अंडरट्रायल असलेल्या दोन्ही आरोपींची अखेर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात ॲड. मंजुषा विशाल साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड. अमित गोळे, ॲड. आकाश एडकें यांच्यासह अन्य वकिलांनीही सहकार्य केले.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











