• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

आरोपांचे बिंग फुटले? डीपी प्रकरणात अरुण निटुरे यांच्या दाव्यांवरच ताकविकी गावकऱ्यांचे गंभीर प्रश्नचिन्ह!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 14, 2026
in राजकारण
0
आरोपांचे बिंग फुटले? डीपी प्रकरणात अरुण निटुरे यांच्या दाव्यांवरच ताकविकी गावकऱ्यांचे गंभीर प्रश्नचिन्ह!
0
SHARES
271
VIEWS

आरोपांचे बिंग फुटले? डीपी प्रकरणात अरुण निटुरे यांच्या दाव्यांवरच ताकविकी गावकऱ्यांचे गंभीर प्रश्नचिन्ह!

ताकविकी येथील डीपीबाबतच्या आरोपांचे खंडन

शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणे चुकीचे – सरपंच

ताकवीकी येथील मंजूर डीपी सर्व शेतकऱ्यांसाठीच

वैयक्तिक असल्याचा दावा चुकीचा असल्याचे गावकऱ्यांचे स्पष्टीकरण

धाराशिव लोकविचार

मौजे ताकवीकी येथे मंजूर झालेल्या वीज डीपी संदर्भात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना देण्यात आलेल्या निवेदनात प्रसारित करण्यात आलेल्या काही आरोपांवर संबंधित शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेत खंडन केले आहे. प्रसारित झालेल्या माहितीत वस्तुस्थिती लपवून दिशाभूल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.तसेच तोतया पीए म्हणत केलेले आरोप बिनबुडाचे आहेत.निवेदन देणाऱ्या निटुरे यांनीच शेतकऱ्याकडे पैश्याची मागणी केल्याचे शेतकरी सांगत असल्याने निटुरे यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे सिद्ध होत आहेत.

संबंधित शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सदरील डीपी ही कोणत्याही एका व्यक्तीसाठी किंवा वैयक्तिक वापरासाठी मंजूर करण्यात आलेली नसून परिसरातील पात्र शेतकऱ्यांना वीजपुरवठा मिळावा यासाठी मंजूर करण्यात आलेली सार्वजनिक सुविधा आहे. मात्र, अरुण निटुरे यांनी ही डीपी स्वतःच्या प्रयत्नांतून मंजूर करून आणल्याचे सांगण्यात येत असून त्याआधारे शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी केल्याचे आरोप करण्यात येत आहेत.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मंजूर असलेल्या डीपीवरून इतर शेतकऱ्यांना वीज जोडणी घेण्यास अडथळे निर्माण केले जात असून ही डीपी वैयक्तिक असल्याचा दावा करून संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत संबंधित शेतकऱ्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता रडे यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली असल्याचे सांगण्यात आले. तसेच डीपीसंदर्भातील सर्व प्रशासकीय नोंदी आणि मंजुरी प्रक्रिया तपासून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, एका वृत्तातून करण्यात आलेले आरोप वस्तुस्थितीला धरून नसून त्यामुळे गावातील शेतकऱ्यांची दिशाभूल होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.

या प्रकरणी सरपंच राजपूत म्हणाले…
“मौजे ताकवीकी येथील मंजूर डीपी ही कोणत्याही एका व्यक्तीची मालमत्ता नसून सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी असलेली सुविधा आहे. याबाबत गैरसमज निर्माण करणारी माहिती पसरविण्याऐवजी संबंधित विभागाच्या नोंदी तपासून वस्तुस्थिती समोर आणावी. गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळणे आणि कोणत्याही प्रकारचा संभ्रम दूर होणे आवश्यक आहे.”
— राजपूत सरपंच, ग्रामपंचायत मौ.ताकवीकी

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादताकाविकी ग्रामपंचायततुळजापूर विधानसभा आमदार राणाजगजितसिंह पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकराजकारण
Previous Post

रवी मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश, देशपांडे स्टँड बाजार चौक रस्ता दुरुस्तीला सुरुवात

Next Post

नळदुर्ग पालिकेत राजकीय भूकंप! भाजपचे नगराध्यक्ष-नगरसेवक ‘लोणावळ्याला’ रवाना; काँग्रेस उमेदवार फिरकेना, निवडणूक एकतर्फी?

Related Posts

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा
राजकारण

अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा

September 4, 2026
Next Post
नळदुर्ग पालिकेत राजकीय भूकंप! भाजपचे नगराध्यक्ष-नगरसेवक ‘लोणावळ्याला’ रवाना; काँग्रेस उमेदवार फिरकेना, निवडणूक एकतर्फी?

नळदुर्ग पालिकेत राजकीय भूकंप! भाजपचे नगराध्यक्ष-नगरसेवक 'लोणावळ्याला' रवाना; काँग्रेस उमेदवार फिरकेना, निवडणूक एकतर्फी?

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!