• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
October 6, 2026
in क्राईम
0
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
0
SHARES
33
VIEWS

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच; पवनचक्की तारचोरीचा पर्दाफाश, लाखोंचा मुद्देमाल जप्त

चोरीच्या तारांचा ‘लोखंडवाला’ कोण? खरेदीदारांची चौकशी झाल्यास मोठे नेटवर्क उघड होण्याची शक्यता

धाराशिव | लोकविचार

पवनचक्कीच्या विद्युतवाहिनीच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत तब्बल ११ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे पवनचक्की तारचोरीच्या गुन्हेगारी साखळीला मोठा धक्का बसला आहे.

५ ऑक्टोबर रोजी LCBचे पथक पेट्रोलिंग करीत असताना मांडवा शिवारात पवनचक्कीच्या तारा पिकअपमध्ये भरल्या जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकत पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून शाम अजिनाथ शिंदे, लाला गोविंद पवार, आकाश श्रीरंग पवार, पवन कालीदास काळे आणि पिकअप चालक अंगद प्रल्हाद शिंदे अशी नावे निष्पन्न झाली.

यावेळी चार जण पसार झाल्याचेही समोर आले.तपासात तेरखेडा, इंदापूर, ढोकी परिसरातील पवनचक्कीच्या नवीन विद्युतवाहिनीच्या तारा पोलवरील लाइन कापून चोरी केल्याची माहिती समोर आली. आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव येथील जाकेर निजाम शेख याच्याकडूनही पोलिसांनी चौकशी केली असून चोरीच्या तारा घेतल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कारवाईत तांब्याची व अॅल्युमिनियमची तार, पिकअप वाहन आणि दोन मोटारसायकली असा एकूण ११.५३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार गुन्हे उघडकीस आले आहेत. यातील शाम अजिनाथ शिंदे हा नळदुर्ग पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असल्याचेही समोर आले आहे.

तारचोरीमागील ‘माल घेणाऱ्यां’पर्यंत तपास पोहोचणे गरजेचेLCBच्या या कारवाईने चोरट्यांना पकडण्याबरोबरच चोरीचा माल नेमका कोण कोण खरेदी करतो, तो कुठे विकला जातो आणि या व्यवहारामागे आणखी कोणकोण सहभागी आहेत, हा महत्त्वाचा प्रश्न पुढे आला आहे. त्यामुळे पोलिसांनी चोरीचा माल स्वीकारणाऱ्या व्यक्तींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची, पूर्वीच्या व्यवहारांची आणि त्यांच्याशी संबंधित इतर व्यक्तींची सखोल चौकशी केल्यास तारचोरीची मोठी साखळी उघड होण्याची शक्यता आहे.

चोरीच्या तारा पुढे कोणत्या व्यापाऱ्यांकडे अथवा भंगार-“लोखंडवाला” व्यवसायाशी संबंधित व्यक्तींकडे जात होत्या, याचा तपास झाल्यास पवनचक्की तारचोरीमागील संपूर्ण नेटवर्क पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे LCBने या प्रकरणाचा तपास केवळ आरोपींपुरता मर्यादित न ठेवता चोरीचा माल स्वीकारणाऱ्या संपूर्ण साखळीपर्यंत पोहोचवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या कारवाईतून LCBने पुन्हा एकदा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची आपली क्षमता दाखवून दिली आहे. आता चोरीचा माल खरेदी करणाऱ्यांपर्यंत तपास पोहोचल्यास या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके तसेच स्थानिक गुन्हे शाखा व क्युआरटी पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केली.

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectorLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलकळंबदरोडाधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनळदुर्गयेरमाळा
Previous Post

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

Next Post

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

Related Posts

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला
क्राईम

मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

September 24, 2026
बसस्थानकात पोलिसाच्याच खिशावर डल्ला;
क्राईम

बसस्थानकात पोलिसाच्याच खिशावर डल्ला;

September 24, 2026
पिस्टल-काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद
क्राईम

पिस्टल-काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद

September 22, 2026
Next Post
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

ताज्या घडामोडी

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!