• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
September 23, 2026
in कृषी
0
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार
0
SHARES
7
VIEWS

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ; सरसकट मदतीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संकटातून मार्ग काढण्यासाठी नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करावे

येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा शासन निर्णय

कळंब तालुक्यातील मलकापूर येथील पीक नुकसानीची केली पाहणी

धाराशिव लोकविचार

दुष्काळाच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करावे.या संकटाच्या काळात राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचा निर्णय घेतला असून,येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा शासन निर्णय (जीआर) काढण्यात येईल,अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.कळंब तालुक्यातील मलकापूर येथे आज रामहरी लोमटे आणि संजय लोमटे यांच्या शेतातील नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधला.त्यावेळी ते बोलत होते.दुष्काळाची परिस्थिती सरसकट असल्याने मदतही सरसकट देण्यात येणार आहे.मदत देताना कोणतेही आढेवेढे घेतले जाणार नाहीत.पंचनामे कायदेशीर प्रक्रियेनुसार करावे लागतील.मात्र,परिस्थिती सरसकट असल्याने मदतीचा निर्णयही सरसकटच असेल,असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.दुष्काळाच्या काळात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा,मुलांचे शिक्षण आणि अन्नधान्य यांची व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल.शेतकऱ्यांना देण्यात येणारे थेट अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे,असे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असून, सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत कर्जमाफी सुरू राहील,असे मुख्यमंत्री म्हणाले.शेतकऱ्यांच्या वीजबिलापोटी ४८ हजार कोटी रुपयांची थकबाकी माफ करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.दुष्काळाच्या या संकटात शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणे आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे,ही सरकारची भूमिका आहे.राज्य सरकार शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व मदत करेल,असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती.अर्चना पाटील,आमदार सर्वश्री.बसवराज पाटील, राणाजगजीतसिंह पाटील,कैलास घाडगे पाटील,प्रवीण स्वामी,माजी आमदार ज्ञानराज चौगुले जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,पोलीस अधीक्षक रितू खोखर यांचेसह विविध विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Tags: dharashivdharashiv collectorLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलदुष्काळधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकशेतकरी आत्महत्या
Previous Post

पीक कापणी प्रयोगातून नुकसानीचे प्रत्यक्ष चित्र समोर येणार

Next Post

पथविक्रेत्यांना ओळखपत्र-विक्री प्रमाणपत्र लवकर देण्याच्या सूचना 

Related Posts

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
कृषी

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

October 2, 2026
दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे
कृषी

दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे

September 26, 2026
जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;
कृषी

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;

September 26, 2026
धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!
कृषी

धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!

September 22, 2026
पालकमंत्री प्रताप सरनाईक थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर
कृषी

पालकमंत्री प्रताप सरनाईक थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर

September 17, 2026
खरीप नुकसानीची शास्त्रीय पाहणी सुरू;
कृषी

खरीप नुकसानीची शास्त्रीय पाहणी सुरू;

September 5, 2026
Next Post
पथविक्रेत्यांना ओळखपत्र-विक्री प्रमाणपत्र लवकर देण्याच्या सूचना 

पथविक्रेत्यांना ओळखपत्र-विक्री प्रमाणपत्र लवकर देण्याच्या सूचना 

ताज्या घडामोडी

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!