• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

गणेश मंडळांना विविध स्पर्धांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
September 4, 2026
in महाराष्ट्र
0
गणेश मंडळांना विविध स्पर्धांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा
0
SHARES
8
VIEWS

गणेश मंडळांना विविध स्पर्धांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे यंत्रणांना निर्देश

जलसंवर्धन,लोककला आणि पर्यावरणपूरक विसर्जनावर भर

धाराशिव लोकविचार

राज्य सरकारने यंदापासून गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले असून, गणेशोत्सवाची परंपरा आणि संस्कृती जपण्याबरोबरच हा उत्सव व्यापक स्वरूपात साजरा व्हावा. जिल्ह्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन राज्यस्तरापर्यंत पोहोचावे,यासाठी संबंधित यंत्रणांनी मंडळांना प्रोत्साहित करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज शुक्रवारी ४ सप्टेंबर रोजी यंदाच्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देणे तसेच विविध उपक्रम राबविण्याच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत जिल्हाधिकारी पुजार बोलत होते.
बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, स्वाती शेंडे,अरुणा गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख व गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी पुजार म्हणाले, ‘‘गणेशोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांनी ऑनलाइन नोंदणी करावी. संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात शांतता समित्यांच्या बैठका घ्याव्यात.या बैठकांमध्ये गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याबाबतच्या शासन निर्णयाची माहिती गणेश मंडळे आणि संबंधितांना द्यावी.’’
जिल्ह्यात चांगले आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारी गणेशोत्सव मंडळे राज्यस्तरावरील स्पर्धेत पोहोचली पाहिजेत. त्यासाठी विविध यंत्रणांनी त्यांना आवश्यक प्रोत्साहन द्यावे. पारंपरिक लोककला लोप पावत असताना गणेशोत्सवासारख्या व्यापक लोकसहभागाच्या उत्सवाच्या माध्यमातून या लोककलांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे.गणेश मंडळांनी आपल्या उपक्रमांमधून पारंपरिक लोककलांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर प्रभावी जनजागृती करता येते.त्यामुळे विशेषतः गणेश मंडळांनी जलसंवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी केले.जिल्ह्यातील विविध गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विविध उपक्रम राबविण्यात यावेत. त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी गणेश मंडळांना सहभागी करून घेत त्यांना प्रोत्साहन द्यावे,असेही त्यांनी स्पष्ट केले.

गणेशमूर्तींच्या विसर्जनावेळी पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले.गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलस्रोत दूषित होणार नाहीत,याची दक्षता घ्यावी. गावांमध्ये आणि शहरांमध्ये योग्य ठिकाणी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम टँक तयार करावेत,असे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात एकूण १ हजार ६८० गणेशोत्सव मंडळे आहेत. यापैकी २५६ ठिकाणी ‘एक गाव,एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.धाराशिव येथील गणेश विसर्जन मार्ग निश्चित करण्यात आला आहे,असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांनी यंदापासून राज्य सरकारने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केल्याची माहिती दिली.तसेच गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यासंदर्भातील शासन निर्णयाची सविस्तर माहिती त्यांनी बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिली.

या बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी,सर्व तहसीलदार तसेच सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadआमदार कैलास पाटीलगणपती बाप्पा मोरयागणेशोत्सवजिल्हाधिकारी कार्यालय धाराशिवधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा

Next Post

खरीप नुकसानीची शास्त्रीय पाहणी सुरू;

Related Posts

जिल्ह्याच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक मैदानात; उद्या मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक
महाराष्ट्र

जिल्ह्याच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक मैदानात; उद्या मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक

November 24, 2026
दुष्काळी परिस्थितीत १६ गावांच्या पाणीप्रश्न सुटला
महाराष्ट्र

दुष्काळी परिस्थितीत १६ गावांच्या पाणीप्रश्न सुटला

November 23, 2026
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;
महाराष्ट्र

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

November 19, 2026
दिवाळीत लालपरीची विक्रमी ५४८ कोटींची कमा
महाराष्ट्र

दिवाळीत लालपरीची विक्रमी ५४८ कोटींची कमा

November 17, 2026
एस टी महामंडळ मध्ये मेगा भरती!
महाराष्ट्र

एस टी महामंडळ मध्ये मेगा भरती!

November 16, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र

दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न

November 16, 2026
Next Post
खरीप नुकसानीची शास्त्रीय पाहणी सुरू;

खरीप नुकसानीची शास्त्रीय पाहणी सुरू;

ताज्या घडामोडी

जिल्ह्याच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक मैदानात; उद्या मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक

जिल्ह्याच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक मैदानात; उद्या मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक

November 24, 2026
दुष्काळी परिस्थितीत १६ गावांच्या पाणीप्रश्न सुटला

दुष्काळी परिस्थितीत १६ गावांच्या पाणीप्रश्न सुटला

November 23, 2026
आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

November 21, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!