• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 27, 2026
in क्राईम
0
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
0
SHARES
65
VIEWS

अचलेर येथील गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करण्याची युवतीसह महिला, ग्रामस्थांची मागणी !

धाराशिव लोकविचार 

लोहारा तालुक्यातील आचलेर येथील गावगुंड प्रदीप पांडुरंग पुजारी याच्यासह त्याच्या टोळक्याकडून मुलींची छेडछाड, महिलांना धमकावणे व युवक व पुरुषांना धारदार शस्त्राने मारहाण करून दहशत माजवली आहे. त्याच्या व त्याच्या टोळीच्या त्रासापासून संपूर्ण ग्रामस्थ भेदरले असून भयभीत झाले असून दहशतीखाली वावरत आहेत.

मुरूम पोलीस प्रशासन कोणतीच कारवाई करीत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या व वैतागून गेलेल्या युवतीसह महिला व पुरुष यांनी त्या गुंडाचा बंदोबस्त करावा व त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी थेट पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय गाठून रितू खोकर यांच्याकडे आपली कैफियत मांडली आहे. दरम्यान, कारवाई न केल्यास आत्महत्या करू असा इशाराही त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी दिला आहे. 

लोहारा तालुक्यातील अचलेर येथील गावगुंड प्रदीप पांडुरंग पुजारी व त्याच्या टोळीमुळे ग्रामस्थांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच त्याच्या व त्याच्या गुंडांपासून जीवित व मालमत्तेस धोका निर्माण झालेला आहे. ग्रामस्थांना धमक्या देणे, सार्वजनिक कामांमध्ये अडथळे निर्माण करणे, माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करून नागरिकांना मानसिक त्रास देणे. तसेच त्याच्याकडून वारंवार तक्रारी करून निरापराध व्यक्तींना त्रास देण्याचे काम केले जात आहेत.

त्याच्या गुंडगिरी वर्तणुकीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गावात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्याच्या विरुद्ध अनेक गुन्हे व तक्रारी नोंद आहेत त्याची सखोल व वस्तुनिष्ठ चौकशी करावी. खोट्या किंवा तथ्यहीश तक्रारी करून नागरिकांना त्रास देणे, बेकायदेशीर कृती केल्याच्या तक्रारीची चौकशी करावी. गावात शांतता सुरक्षितता व कायदा व्यवस्था कायम राखण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात. त्यामुळे त्याची चौकशी करून त्याच्याविरुद्ध कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.

यावेळी सरपंच कांताबाई सुभाष सोलंकर, सुनील मदने, सुभाष सोलंकर, बंडूसिंग बायस, अनिल सोलंकर, विधीज्ञ भीम सोलंकर, कस्तुराबाई ठेंगील, लताबाई खरात, कांचन मदने, प्रभावती ठेंगील, विशाल सोलंकर, सुरेश सोलंकर, सागर उपासे, विठ्ठल सोलंकर, सहदेव सुभेदार, कोंडीबा सोलंकर, काशिनाथ खरात, बालाजी खरात, संतोष सोलंकर, सुभाष रुपनर, ज्ञानेश्वर ठेंगील, यशवंत ठेंगील, चंद्रकांत बंडगर, बाबुशा चिंचोले, संतोष पवार, प्रेमराज राठोड, संजय जाधवर, गयाबाई सुभेदार, राजाबाई ठेंगील, सुमनबाई सोलंकर, सजाबाई खटके, भारताबाई गोपने, अंबिका गोपने, पाराबाई कारले, सखुबाई यमगर, छबुबाई साखरे, धनसिंग राठोड, अशोक मदने, पांडुरंग कारले, भीम पवार, रघुनाथ खरात यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashiv collectorLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलआमदार प्रवीण स्वामीधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

Next Post

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!