• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 18, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
166
VIEWS

नगरसेवक गणेश घोडके यांच्या पाठपुराव्याने बंद बोरवेल पुन्हा सुरू…आठवडी बाजार परिसरातील पाणीटंचाईला अखेर दिलासा;

धाराशिव | लोकविचार

धाराशिव नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १२ मधील आठवडी बाजार परिसरातील नागरिकांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणीप्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नगरसेवक गणेश घोडके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या भागातील बंद पडलेली बोरवेल पुन्हा सुरू करण्यात आली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रभाग क्रमांक १२ मध्ये इंदिरानगर, वडार गल्ली, आगड गल्ली, झोरे गल्ली तसेच आठवडी बाजार परिसर या बरोबरच सांजा रोड कडील काही भाग समावेश होतो. या प्रभागातील काही भागात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य नागरिक वास्तव्यास असलेल्या या परिसरात मागील एक वर्षापासून पाण्याची तीव्र टंचाई जाणवत होती. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी पायपीट करावी लागत होती, तर अनेकांना विकत पाणी घेऊन घरगुती गरजा भागवाव्या लागत होत्या.

या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार नगरसेवक गणेश घोडके यांच्याकडे मागणी केली होती. नागरिकांच्या अडचणीची गांभीर्याने दखल घेत त्यांनी आठवडी बाजार परिसरातील अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या कूपनलिकेची (बोरवेल) माहिती घेतली. त्यानंतर संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून ही बोरवेल पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले.

अखेर प्रशासनाच्या सहकार्याने बंद पडलेली बोरवेल सुरू करण्यात यश आले आणि परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला. यामुळे नागरिकांना आता पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नसून दैनंदिन जीवन अधिक सुलभ होणार आहे.

बोरवेल सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी नगरसेवक गणेश घोडके तसेच संबंधित प्रशासनाचे आभार व्यक्त केले. “आमच्या पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आता तो मार्गी लागल्याने मोठा दिलासा मिळाला आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे, घरासमोर पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने अनेक महिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. रोजच्या पाण्यासाठीची धावपळ आणि त्रास संपल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आमदार राणाजगजितसिंह पाटील, मल्हार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव नगर परिषद मध्ये भाजपची एकहाती सत्ता असल्याने नगरसेवक गणेश घोडके यांनी नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे तसेच नगरपरिषद गटनेते अमित शिंदे यांच्या कडे पाठपुरावा करून प्रभागातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देत विकासकामांना प्राधान्य देण्याची भूमिका नगरसेवक गणेश घोडके यांनी घेतली असून, त्यांच्या या पुढाकारामुळे प्रभाग क्रमांक १२ मधील आठवडी बाजार परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनगर परिषद धाराशिवनगरसेवकनगराध्यक्षपाणी पुरवठा
Previous Post

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

Next Post

कळंबमध्ये अल्पवयीन मुलीचा पाठलाग! छेडछाड अन् घरात घुसून मारहाण!

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post
कळंबमध्ये अल्पवयीन मुलीचा पाठलाग! छेडछाड अन् घरात घुसून मारहाण!

कळंबमध्ये अल्पवयीन मुलीचा पाठलाग! छेडछाड अन् घरात घुसून मारहाण!

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!