• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

कळंब ड्रग्ज प्रकरणात पोलिसांची ‘झाडाझडती’.!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 11, 2026
in क्राईम
0
कळंब ड्रग्ज प्रकरणात पोलिसांची ‘झाडाझडती’.!
0
SHARES
6
VIEWS

कळंब ड्रग्ज प्रकरणात पोलिसांची ‘झाडाझडती’.!सहा दिवसांच्या विलंबावर एसपी ऍक्शन मोडवर? ‘मोठे मासे’ गळाला लागणार का?

कळंब लोकविचार

कळंबमधील एमडी ड्रग्ज प्रकरणात तिसऱ्या संशयिताला अटक झाल्यानंतर आता वरिष्ठ पोलीस प्रशासनही ॲक्शन मोडमध्ये आल्याची माहिती समोर येत आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षकांनी कळंब प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आज कळंब येथील प्रभारी अधिकारी यांच्यासह प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांना बोलावून घेत झाडाझडती घेतल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, या आठवड्यात छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आय जी) धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही हालचाल महत्त्वाची मानली जात आहे. कळंब येथील प्रकरणाबाबत कळंब शहरातील एक शिष्टमंडळ आय जी यांची  भेट घेऊन ड्रग्स प्रकरणी निवेदन देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

मात्र, या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न कायम आहे—४ ऑगस्ट रोजी एमडी ड्रग्ज प्रकरण उघडकीस आल्यानंतर काल, १० ऑगस्ट रोजी लखन गायकवाड याला अटक करण्यासाठी तब्बल सहा दिवस का लागले?

सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या दिवशी मूळ कारवाई झाली त्या दिवशी लखन गायकवाड हा संबंधित आरोपींसोबत असल्याचे सांगितले जात आहे. असे असेल तर त्याच्यावर तत्काळ कारवाई का झाली नाही? सहा दिवसांचा विलंब नेमका कशामुळे झाला? हा स्थानिक पोलिसांच्या तपासातील विलंब आहे की त्यामागे अन्य काही कारण होते? या प्रश्नांची उत्तरे आता तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे.

दरम्यान, कळंबमधील ड्रग्ज प्रकरण केवळ तीन आरोपींपुरते मर्यादित आहे की यामागे मोठी पुरवठा साखळी आहे, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. ‘मोठे मासे’ गळाला लागतात का, ड्रग्जचा पुरवठा कुठून होत होता आणि आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात, यावरच पुढील कारवाईची खरी दिशा स्पष्ट होणार आहे.

पोलीस अधीक्षकांच्या आजच्या हालचाली आणि या आठवड्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दौऱ्यामुळे कळंब ड्रग्ज प्रकरणाला आता नवे गांभीर्य प्राप्त झाले आहे. 

आता कारवाई केवळ छोट्या माशांपुरती राहणार की ड्रग्जच्या मुळापर्यंत पोहोचून ‘मुख्य मासा’ जाळ्यात येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकविचार — सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक : अमजद सय्यद | 083900 88786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashiv collectordharashiv osmanabaddrugsअमली पदार्थआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपोलिस अधीक्षक रितू खोखर
Previous Post

Next Post

कळंब ड्रग्ज प्रकरणात पोलिसांची ‘झाडाझडती’!

Related Posts

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ
क्राईम

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
क्राईम

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;
क्राईम

मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;

August 25, 2026
चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

August 25, 2026
गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे
क्राईम

गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे

August 24, 2026
नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ
क्राईम

नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ

August 24, 2026
Next Post
कळंब ड्रग्ज प्रकरणात पोलिसांची ‘झाडाझडती’!

कळंब ड्रग्ज प्रकरणात पोलिसांची ‘झाडाझडती’!

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!