• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

न.प.उपाध्यक्ष अक्षय ढोबळेंनी नगराध्यक्षांसह शहराध्यक्षांना डावलले? पोस्टरमधून तिघांचे फोटो गायब चर्चांना उधाण!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 17, 2026
in राजकारण
0
न.प.उपाध्यक्ष अक्षय ढोबळेंनी नगराध्यक्षांसह शहराध्यक्षांना डावलले? पोस्टरमधून तिघांचे फोटो गायब चर्चांना उधाण!
0
SHARES
693
VIEWS

न.प.उपाध्यक्ष अक्षय ढोबळेंनी नगराध्यक्षांसह शहराध्यक्षांना डावलले? पोस्टरमधून तिघांचे फोटो गायब चर्चांना उधाण!

धाराशिव | लोकविचार

धाराशिव नगरपरिषदेत उपाध्यक्षपदाच्या बदलाच्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच उपाध्यक्ष अक्षय ढोबळे यांच्या नव्या पोस्टर डिझाईनमुळे शहरातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. यापूर्वी प्रत्येक होर्डिंग, पोस्टर आणि सोशल मीडियावरील डिझाईनमध्ये पक्षाचे शहराध्यक्ष तथा धाराशिव नगरपालिकेचे गटनेते अमित शिंदे, नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक राहुल काकडे यांचे फोटो नियमितपणे झळकत होते. मात्र, आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या डिझाईनमध्ये या तिघांचेही फोटो नसल्याचे दिसून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर सुमारे सहा महिन्यांपूर्वी अक्षय ढोबळे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती. त्यावेळी पक्षांतर्गत सहा महिन्यांनंतर दुसऱ्या नगरसेवकाला संधी देण्याबाबत सहमती झाल्याची चर्चा होती. आता सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही उपाध्यक्षपदात कोणताही बदल झालेला नसल्याने या चर्चांना पुन्हा वेग आला आहे.

त्यातच नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेला उपाध्यक्षपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या काही नगरसेवकांची अनुपस्थिती आणि त्यानंतर लगेचच प्रसिद्ध झालेल्या पोस्टरमधून पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे फोटो गायब झाल्याने अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी अक्षय ढोबळे यांच्या सर्वच प्रसिद्धी साहित्यामध्ये शहराध्यक्ष तथा गटनेते अमित शिंदे, नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे आणि भाजयुमो जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक राहुल काकडे यांना प्रमुख स्थान दिले जात होते. मात्र, नव्या डिझाईनमध्ये तिघांनाही वगळण्यात आल्याने हा केवळ डिझाईनमधील बदल आहे की त्यामागे पक्षांतर्गत नाराजी अथवा राजकीय संदेश दडलेला आहे, याबाबत शहरभर चर्चा रंगली आहे.

भाजपकडून उपाध्यक्षपदाच्या बदलाबाबत किंवा पोस्टरमधील या बदलाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे नगरपरिषदेत लवकरच उपाध्यक्षपदात बदल होणार का, तसेच या पोस्टरमागील नेमके राजकारण काय, याकडे धाराशिवकरांचे लक्ष लागले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: dharashiv collectorआमदार कैलास पाटीलउस्मानाबादतुळजापूर विधानसभा आमदार राणाजगजितसिंह पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनगर परिषद धाराशिवनगराध्यक्षभाजपाभारतीय जनता पक्षमल्हार पाटील
Previous Post

धाराशिव नगर परिषदेतील २२ रिक्त पदे तातडीने भरा खासदार ओमराजे निंबाळकर यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

Next Post

मर्यादित कार्यक्षेत्र असलेल्या ‘विद्युत सागर’ संस्थेला धाराशिव-लातूरमध्ये आऊटसोर्सिंगची कामे कशी ? 

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post
मर्यादित कार्यक्षेत्र असलेल्या ‘विद्युत सागर’ संस्थेला धाराशिव-लातूरमध्ये आऊटसोर्सिंगची कामे कशी ? 

मर्यादित कार्यक्षेत्र असलेल्या 'विद्युत सागर' संस्थेला धाराशिव-लातूरमध्ये आऊटसोर्सिंगची कामे कशी ? 

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!