• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांच्या मदतीला ! कॅमेरे असून अडचण नसून खोळंबा !

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 2, 2026
in क्राईम
0
धाराशिव बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांच्या मदतीला ! कॅमेरे असून अडचण नसून खोळंबा !
0
SHARES
1
VIEWS

धाराशिव बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांच्या मदतीला सीसीटीव्ही कॅमेरे असून अडचण नसून खोळंबा !

धाराशिव लोकविचार

बस स्थानकात होणाऱ्या प्रवासी गर्दीच्या फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने तसेच पुरुषांच्या खिशातील पॉकेट देखील चोरण्याचे प्रमाण दिवसाढवळ्या सर्रासपणे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. चोरट्यांना रोखण्यासाठी ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद व्हावेत यासाठी ८ सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविलेले आहेत. मात्र, जे कॅमेरे बसवलेत त्याचा आणि बसमध्ये चढणारे प्रवाशी व त्या प्रवाशांना लुटणारे चोरटे त्या कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाहीत अशाच रीतीने बसविलेले आहेत. ते कॅमेरे चोरट्यांच्या मदतीसाठी असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या प्रकारच्या अंतरावर कॅमेरे असल्यामुळे त्यामध्ये प्रवासी व चोरटे यांचा चेहरा देखील स्पष्टपणे दिसून येत नाही. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था धाराशिव बस स्थानकाची झाली आहे. विशेष म्हणजे राज्याचे परिवहन मंत्री, एस टी महामंडळाचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सदरील कॅमेरे प्रत्येक फलाट फॉर्मवर सर्व ठळकपणे दिसेल अशा पद्धतीने हाय मेगा फिक्सल सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी प्रवाशी वर्गातून होऊ लागली आहे.धाराशिव येथील बस स्थानकामध्ये बस लावण्यासाठी २२ फलाट फार्म आहेत. उत्तरेकडील बाजूस १ ते १० फलाट फार्मवर कळंब, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, बुलढाणा व नागपूर या बसेस लावल्या जातात.तर दक्षिणेकडील बाजूस ११ ते २२ फलाट फार्मवर तुळजापूर, सोलापूर, अक्कलकोट, वैराग, बार्शी, कोल्हापूर, सांगली, पंढरपूर, नळदुर्ग, उमरगा, औसा या भागातील बस लावल्या जातात. मात्र, या दोन्ही फलाट फॉर्मवर आतील व बाहेरील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. मात्र, बाहेरील बाजूस असलेले कॅमेरे दोन्ही टोकाला बसलेले आहेत. त्यामुळे बसमध्ये चढणाऱ्या व उतरणाऱ्या प्रवाशांचे चेहरे अस्पष्ट दिसतात. याच संधीचा फायदा घेऊन चोरटे प्रवासी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, पर्स व पिशवीमधील रोकडची तर काही विद्यार्थ्यीनींचे मोबाईल व पर्स तसेच या पुरुषांचे देखील खिसे कापून मौल्यवान साहित्य चोरुन चोरटे पलायन करतात. मात्र, त्यांचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये अस्पष्ट दिसत आहेत. त्यामुळे हाय फिक्सल असलेले कॅमेरे २२ फलाट फार्मर बसवून प्रवाशांची होणारी लूट थांबवावी अशी मागणी होऊ लागली आहे. कारण दि.३० जून रोजी दुपारी १ वाजता लागणारी धाराशिव वैराग ही बस फलट क्रमांक ११ वर लागली होती. या बसला प्रवाशांची मोठी गर्दी होती. या बसमध्ये धाराशिव तालुक्यातील झरेगाव येथील गंगाबाई मारुती संकपाळ वय (६७ वर्ष) या आपल्या गावाकडे जाण्यासाठी चढत होत्या. मात्र, या गर्दीचा फायदा घेत आज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील २५ हजार रुपयांचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी व सोन्याचे पान असलेला गळ्यातील माळ चोरून नेली. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यामध्ये गंगाबाई संकपाळ यांच्या तक्रारीवरून भा.न्या.सं. कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास संबंधित पोलीस अधिकारी करीत आहेत. अशा प्रकारच्या चोरीच्या घटना टाळण्यासाठी मंत्री सरनाईक यांनी तात्काळ बस स्थानकाच्या फलाट फार्मवर हाय फिक्सलचे कॅमेरे बसवावेत, अशी मागणी प्रवाशांतून होऊ लागली आहे……….बंदोबस्तासाठी पोलिसांची संख्या वाढविण्याची गरज जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बस स्थानकात रात्रंदिवस प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने पोलीस कर्मचाऱ्यांना नियुक्त केले जाते. मात्र, आवश्यक त्या प्रमाणात पोलीस नसल्यामुळे या ठिकाणी देखरेख ठेवण्यासाठी त्यांची तारांबळ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होऊ लागली आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव लोकविचार
Previous Post

तोतया पोलीस अखेर गजाआड!; धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई, आता ‘शासकीय कामात अडथळा’चा गुन्हा दाखल होणार का?

Next Post

अधिपरिचारका व परिसेविका यांची समपदावर समायोजन करण्याच्या मागणीसाठी निदर्शने 

Related Posts

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ
क्राईम

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
क्राईम

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;
क्राईम

मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;

August 25, 2026
चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

August 25, 2026
गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे
क्राईम

गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे

August 24, 2026
नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ
क्राईम

नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ

August 24, 2026
Next Post
अधिपरिचारका व परिसेविका यांची समपदावर समायोजन करण्याच्या मागणीसाठी निदर्शने 

अधिपरिचारका व परिसेविका यांची समपदावर समायोजन करण्याच्या मागणीसाठी निदर्शने 

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!