• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विकासाची भेट! प्रभाग क्रमांक २० मध्ये रस्ते विकासाचे भूमिपूजन

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 27, 2026
in महाराष्ट्र
0
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विकासाची भेट! प्रभाग क्रमांक २० मध्ये रस्ते विकासाचे भूमिपूजन
0
SHARES
16
VIEWS

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विकासाची भेट! प्रभाग क्रमांक २० मध्ये रस्ते विकासाचे भूमिपूजन विलास लोंढे आणि बापू पवार यांच्या वतीने सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस उत्साहात

धाराशिव लोकविचार 

भाजपा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक २०, अण्णाभाऊ साठे नगर येथे विकासकामांसह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून नगरोत्थान महाअभियान अंतर्गत रस्ते विकास प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन मल्हार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याचबरोबर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात मल्हार पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

प्रभाग क्रमांक २० मधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या प्रश्नाला अखेर मार्ग मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरोत्थान महाअभियानातून सुरू होत असलेल्या या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सोयीस्कर होणार असून, अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

यावेळी मल्हार पाटील यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सामाजिक समता, परिवर्तन आणि सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी अण्णाभाऊ साठे यांनी दिलेल्या विचारांचा आदर्श समाजाने कायम जपला पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात नगर परिषदेतील पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे, बापू पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मल्हार पाटील यांचा सत्कार केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तसेच पेढा भरवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रेम, सन्मान आणि आत्मीयतेमुळे आपण भारावून गेलो असून, नागरिकांनी व्यक्त केलेला विश्वास हीच आपल्या कार्याची खरी प्रेरणा असल्याचे मल्हार पाटील यांनी सांगितले.

“विकासाची वाटचाल आणि जनतेची सेवा हेच माझ्या वाढदिवसाचे खरे औचित्य आहे,” असे सांगत त्यांनी विकासकामांना प्राधान्य देण्याचा आपला निर्धार पुन्हा व्यक्त केला. वाढदिवस हा केवळ शुभेच्छा स्वीकारण्याचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या रस्त्याचा विषय तब्बल २० ते २५ वर्षांपासून प्रलंबित होता. अखेर हा प्रश्न मार्गी लागल्याने प्रभागातील नागरिकांनी नगरसेवक विलास लोंढे, वंदना पवार तसेच मल्हार पाटील यांचे आभार व्यक्त केले. यापुढील काळातही प्रभाग क्रमांक २० मधील उर्वरित विकासकामे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असून, या भागात विकासाची गंगा अशीच अखंड वाहत राहील, असा विश्वास मल्हार पाटील आणि पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास बांधकाम सभापती अभिजित काकडे, नियोजन सभापती आकाश तावडे, शिक्षण सभापती प्रवीण माळी, स्वच्छता सभापती अक्षय ढोबळे, नगरसेवक राहुल काकडे, वंदना पवार, दाजी आप्पा पवार, धनंजय पाटील, बापू पवार यांच्यासह प्रभाग क्रमांक २० मधील असंख्य नागरिक उपस्थित होते.

विकासकामांचे भूमिपूजन, सामाजिक उपक्रम, नागरिकांशी संवाद आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका अशा विविध उपक्रमांनी प्रभाग क्रमांक २० मध्ये मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण आणि समाजाभिमुख वातावरणात साजरा करण्यात आला.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv osmanabadosmanabadअभिष्टचिंतन सोहळाउस्मानाबादतुळजापूर विधानसभा आमदार राणाजगजितसिंह पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमल्हार पाटीलवाढदिवस शुभेच्छा
Previous Post

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षणाला प्रोत्साहन सभापती आकाश तावडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

Next Post

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ नगर येथे २५० नागरिकांची आयुष्मान भारत कार्ड नोंदणी – दिपाली धनंजय पाटील 

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ नगर येथे २५० नागरिकांची आयुष्मान भारत कार्ड नोंदणी – दिपाली धनंजय पाटील 

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ नगर येथे २५० नागरिकांची आयुष्मान भारत कार्ड नोंदणी - दिपाली धनंजय पाटील 

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!