• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

भारत विद्यालय मुख्याध्यापकांच्या पत्राची दखल मार्गावर प्रशासनाची ‘मलमपट्टी’ विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून प्रशासनाचे आभार

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 13, 2026
in शिक्षण
0
भारत विद्यालय मुख्याध्यापकांच्या पत्राची दखल मार्गावर प्रशासनाची ‘मलमपट्टी’ विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून प्रशासनाचे आभार
0
SHARES
204
VIEWS

भारत विद्यालय मुख्याध्यापकांच्या पत्राची दखल मार्गावर प्रशासनाची ‘मलमपट्टी’ विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून प्रशासनाचे आभार

धाराशिव लोकविचार

प्रभाग क्रमांक १७ व २० मधील धारसुर मर्दिनी कमान ते भारत विद्यालय, धाराशिव या मार्गाच्या दुरवस्थेबाबत भारत विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी ५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच परीक्षार्थींना होणाऱ्या गैरसोयीबाबत लक्ष वेधले होते. त्यानंतर प्रशासनाने या मार्गावर काही प्रमाणात काम केल्याचे दिसून येत असले तरी प्रत्यक्षात ही केवळ तात्पुरती मलमपट्टी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
रविवार १४ जून २०२६ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी भारत विद्यालय येथे परीक्षा केंद्र असल्याने परीक्षार्थी, अधिकारी, कर्मचारी आणि स्टाफ यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी शाळा व्यवस्थापनाने पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने काही ठिकाणी तात्पुरती दुरुस्ती केली. मात्र रस्त्यावरील खड्डे पूर्णपणे बुजविण्यात आलेले नसून अनेक ठिकाणी समस्या कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, शाळेच्या परिसरात अजूनही पावसाचे पाणी साचलेले आहे. तसेच रस्त्यालगत असलेली भंगार वाहने आणि इतर साहित्यही हटविण्यात आलेले नाही. त्यामुळे ही कारवाई कायमस्वरूपी उपाययोजना नसून केवळ वरवरची मलमपट्टी असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
काही नागरिकांनी असा सवाल उपस्थित केला आहे की, रस्त्याची संपूर्ण दुरुस्ती आणि परिसराची स्वच्छता करण्याऐवजी केवळ फोटोसेशनसाठी किंवा वरिष्ठांना काम झाल्याचे दाखविण्यासाठी ही कारवाई करण्यात आली का? कारण प्रत्यक्ष परिस्थितीत अनेक समस्या अद्याप कायम असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, प्रशासनाने केलेल्या या कामाचे श्रेय घेण्यासाठी काही राजकीय व्यक्ती पुढे येत असल्याचीही चर्चा परिसरात रंगली आहे. मात्र स्थानिक नागरिकांच्या मते, या कामाची सुरुवात भारत विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या पत्रव्यवहार आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू झालेल्या कामाचे अनावश्यक राजकारण करू नये, अशी भूमिका नागरिक व्यक्त करत आहेत.
विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना दिलासा मिळावा यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत असून, तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी संपूर्ण रस्ता दुरुस्त करून परिसरातील स्वच्छतेच्या प्रश्नांचाही कायमस्वरूपी निपटारा करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #धाराशिव #उस्मानाबाद #क्रांतीदिन #शाळा #झेंडा_वंदन #माध्यमिकdharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकशिक्षण
Previous Post

धाराशिवमध्ये ‘थंड पाण्याच्या’ नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळ! तुकाराम मुंडे यांचे लक्ष RO / जार प्लांटकडे वळणार का?

Next Post

तोतया पोलिसाच्या रुबाबामागे कोणाचा वरदहस्त? विनयभंगाच्या तक्रारीपूर्वीच ठाण्यातून पळवून लावल्याचा गंभीर आरोप! सखोल चौकशीची मागणी

Related Posts

शिक्षण प्रेरणा महोत्सवाचे आयोजन
शिक्षण

शिक्षण प्रेरणा महोत्सवाचे आयोजन

September 11, 2026
दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा
शिक्षण

दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा

September 2, 2026
धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी
शिक्षण

धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !
शिक्षण

शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !

July 9, 2026
अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…
शिक्षण

अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…

July 8, 2026
जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती
शिक्षण

जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती

July 4, 2026
Next Post
तोतया पोलिसाच्या रुबाबामागे कोणाचा वरदहस्त? विनयभंगाच्या तक्रारीपूर्वीच ठाण्यातून पळवून लावल्याचा गंभीर आरोप! सखोल चौकशीची मागणी

तोतया पोलिसाच्या रुबाबामागे कोणाचा वरदहस्त? विनयभंगाच्या तक्रारीपूर्वीच ठाण्यातून पळवून लावल्याचा गंभीर आरोप! सखोल चौकशीची मागणी

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!