• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

तोतया पोलिसाच्या रुबाबामागे कोणाचा वरदहस्त? विनयभंगाच्या तक्रारीपूर्वीच ठाण्यातून पळवून लावल्याचा गंभीर आरोप! सखोल चौकशीची मागणी

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 14, 2026
in क्राईम
0
तोतया पोलिसाच्या रुबाबामागे कोणाचा वरदहस्त? विनयभंगाच्या तक्रारीपूर्वीच ठाण्यातून पळवून लावल्याचा गंभीर आरोप! सखोल चौकशीची मागणी
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तोतया पोलिसाच्या रुबाबामागे कोणाचा वरदहस्त? विनयभंगाच्या तक्रारीपूर्वीच ठाण्यातून पळवून लावल्याचा गंभीर आरोप! सखोल चौकशीची मागणी

धाराशिव लोकविचार

आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम ७५ व ७८(१) अन्वये एका ३६ वर्षीय महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती १३ जून रोजी दुपारी कामानिमित्त समर्थ नगर परिसरात गेली होती. काम आटोपून जिल्हा परिषदेच्या बाजूच्या रस्त्याने खाजगी नोकरी करीत असलेल्या कार्यालयाकडे जात असताना दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास एका मोटारसायकलस्वाराने तिचा पाठलाग केला. संबंधित व्यक्तीने महिलेकडे मोबाईल क्रमांकाची मागणी केली. महिलेने नकार दिल्यानंतर “तू काय अप्सरा लागून गेली आहेस का?” असे म्हणत तिचा डावा हात धरून तिच्याशी हुज्जत घालत विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.या घटनेनंतर महिलेने आरडाओरडा केल्याने तिच्या भावाचा मित्र तेथे आला. त्याला पाहताच संबंधित व्यक्ती मोटारसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र मोटारसायकलचा क्रमांक एमएच-१३-सीएल-८१७० असल्याचे नोंदवण्यात आले आणि महिलेच्या भावाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर संशयिताला पकडून आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये आणल्याचा दावा पीडित महिलेच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.मात्र, स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवणारा आणि जिल्ह्यात “झिरो पोलीस” किंवा पोलीस खबऱ्या म्हणून वावरणाऱ्या व्यक्तीला आता पोलिस कोठडीची हवा खावी लागणार आहे. विशेष म्हणजे पीडितेची फिर्याद नोंदवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी ठाण्यात नसल्याने पाच ते सहा तास लागले.

पीडितेच्या भावाने आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, इतक्या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणानंतरही संबंधित व्यक्ती पोलीस पोलिस ठाण्यात रुबाबात वावरत होती आणि कोणत्याही प्रकारची भीती त्याच्या वागण्यात दिसत नव्हती. त्यामुळे या व्यक्तीला नेमका कोणाचा आश्रय आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.स्थानिक स्तरावर मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीवर यापूर्वीही स्वतःला पोलीस म्हणून वावरत असल्याचे तसेच विविध गैरप्रकारांचे आरोप झालेले आहेत. काही महिन्यांपूर्वी धाराशिव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील एका प्रकरणातही त्याची चौकशी झाल्याची चर्चा होती. त्या प्रकरणात काही पोलीस कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली होती, मात्र संबंधित व्यक्तीवर कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे समोर आले नाही.या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संशयिताला पोलीस स्टेशनमधून नेमके कोणी सोडले? तो स्वतः बाहेर गेला की त्याला मदत करण्यात आली? तो पोलीस स्टेशनमध्ये किती वेळ होता? या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे, अशी मागणी होत आहे.तसेच घटना घडल्यानंतर संशयिताने कोणकोणत्या पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क साधला, त्यामध्ये नेमके काय संभाषण झाले, याचाही तांत्रिक तपास करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर), सीसीटीव्ही फुटेज आणि पोलीस स्टेशनमधील नोंदींची सखोल तपासणी झाल्यास या प्रकरणातील अनेक बाबी स्पष्ट होऊ शकतात, असे मत नातेवाईकांनी व्यक्त केले आहे.नागरिकांमध्येही या प्रकरणामुळे संतापाचे वातावरण असून, जर यापूर्वीच संबंधित व्यक्तीवर झालेल्या आरोपांची गांभीर्याने दखल घेऊन योग्य कारवाई करण्यात आली असती, तर एखाद्या महिलेच्या विनयभंगासारखे गंभीर कृत्य करण्याचे धाडस त्याने केले नसते, अशी भावना व्यक्त केली जात आहे.या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच स्वतःला पोलीस म्हणून वावरणाऱ्या अशा व्यक्तींना कोणाचा राजकीय किंवा प्रशासकीय वरदहस्त आहे का, याचाही तपास करण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

भारत विद्यालय मुख्याध्यापकांच्या पत्राची दखल मार्गावर प्रशासनाची ‘मलमपट्टी’ विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून प्रशासनाचे आभार

Next Post

रवी मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश, देशपांडे स्टँड बाजार चौक रस्ता दुरुस्तीला सुरुवात

Next Post
रवी मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश, देशपांडे स्टँड बाजार चौक रस्ता दुरुस्तीला सुरुवात

रवी मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश, देशपांडे स्टँड बाजार चौक रस्ता दुरुस्तीला सुरुवात

Recent Posts

  • जुना उपळा रोडवरील जीवघेणा खड्डा काँक्रीटने बुजवला
  • १५ ऑगस्टला १५१ फूट भगवा ध्वजाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार लोकार्पण!
  • १५ ऑगस्ट रोजी १५१ फूट भगवा ध्वज चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण!
  • ‘माऊली’च्या नावावर कोट्यवधींचा खेळ?
  • पत्रकारांच्या प्रश्नांसाठीचा लढा आणखी तीव्र करणार : संदीप काळे

Recent Comments

  1. vvhfntlqni on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. lsogddnnxq on नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण
  3. Kristian Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. shpnjwdonp on नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण
  5. Austen Web on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.