• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

“सहा महिने अदृश्य नगरसेवक पावसाळ्याच्या तोंडावर जागे रिल्स काढून स्वच्छतेचा दिखावा की नागरिकांची दिशाभूल?”

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 11, 2026
in राजकारण
0
“सहा महिने अदृश्य नगरसेवक पावसाळ्याच्या तोंडावर जागे रिल्स काढून स्वच्छतेचा दिखावा की नागरिकांची दिशाभूल?”
0
SHARES
339
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“सहा महिने अदृश्य नगरसेवक पावसाळ्याच्या तोंडावर जागे रिल्स काढून स्वच्छतेचा दिखावा की नागरिकांची दिशाभूल?”

धाराशिव लोकविचार

धाराशिव शहरात पावसाळा तोंडावर येताच अनेक नगरसेवकांनी आपल्या प्रभागांमध्ये स्वच्छता मोहिमांचा धडाका लावला आहे. मात्र निवडून आल्यापासून जवळपास सहा महिने अदृश्य असलेले नगरसेवक अचानक खडबडून जागे झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. एका ट्रॅक्टर आणि एका जेसीबीच्या सहाय्याने एका दिवशी एका प्रभागात तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या प्रभागात स्वच्छता मोहीम राबवली जात असून त्याचा मोठा गाजावाजा सोशल मीडियावर केला जात आहे.नागरिकांचा प्रश्न मात्र सरळ आणि स्पष्ट आहे – केवळ काही तास स्वच्छता करून संपूर्ण प्रभाग स्वच्छ होणार आहे का? एका दिवसाच्या दिखाऊ मोहिमेमुळे अनेक महिन्यांपासून साचलेली घाण, तुंबलेल्या नाल्या आणि अस्वच्छतेचे प्रश्न मार्गी लागणार आहेत का?विशेष म्हणजे ज्या नाल्या आणि रस्त्यांची स्वच्छता आज केली जात आहे, त्या यापूर्वी किती दिवस दुर्लक्षित होत्या? जर आज स्वच्छता करण्याची गरज भासली, तर आतापर्यंत स्वच्छता विभागाचे कर्मचारी आणि संबंधित ठेकेदार नेमके काय करत होते? संबंधित स्वच्छता ठेकेदारांचे बिल कोणत्या कामाच्या आधारे काढण्यात आले? जर स्वच्छता झालीच नव्हती तर नगरसेवकांनी सहा महिन्यांपासून याबाबत आवाज का उठवला नाही? ठेकेदारांवर कारवाईची मागणी का केली नाही?अनेक ठिकाणी स्वच्छता मोहिमेपेक्षा रिल्स आणि व्हिडिओ शूटिंगवरच अधिक भर दिला जात असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. काही मिनिटे यंत्रणेसोबत उभे राहून व्हिडिओ तयार करणे आणि त्यानंतर प्रभाग पुन्हा वाऱ्यावर सोडणे, हीच सध्या काही नगरसेवकांची कार्यपद्धती बनल्याचा आरोप होत आहे.नागरिकांच्या मते, संपूर्ण प्रभागाची नियमित आणि प्रभावी स्वच्छता झाल्यानंतर त्याचे कौतुक व्हायला हवे. मात्र केवळ पावसाळ्याच्या तोंडावर काही तासांची मोहीम राबवून स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र दिसत आहे.या निमित्ताने धाराशिव नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या कामकाजावरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील अनेक भागांमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोघेही आतापर्यंत नेमके कुठे होते, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.पावसाळ्याच्या तोंडावर सुरू झालेली ही स्वच्छता मोहीम खरोखरच शहर स्वच्छ करण्यासाठी आहे की केवळ सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी, याचे उत्तर आता संबंधित नगरसेवक आणि नगर परिषद स्वच्छता प्रशासनालाच द्यावे लागणार आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलआमदार राणाजगजीतसिंह पाटील तुळजापूर भारतीय जनता पक्ष आई तुळजाभवानी बीजेपी भाजपाउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनगर परिषद धाराशिवभारतीय जनता पक्षराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षसत्ताधारी
Previous Post

ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याचे वाहनतळ अस्वच्छतेच्या विळख्यात!

Next Post

विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर तुतारीच्या नगरसेवकांची भाजप आमदारांच्या निवासस्थानी भेट!

Next Post
विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर तुतारीच्या नगरसेवकांची भाजप आमदारांच्या निवासस्थानी भेट!

विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर तुतारीच्या नगरसेवकांची भाजप आमदारांच्या निवासस्थानी भेट!

Recent Posts

  • जुना उपळा रोडवरील जीवघेणा खड्डा काँक्रीटने बुजवला
  • १५ ऑगस्टला १५१ फूट भगवा ध्वजाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार लोकार्पण!
  • १५ ऑगस्ट रोजी १५१ फूट भगवा ध्वज चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण!
  • ‘माऊली’च्या नावावर कोट्यवधींचा खेळ?
  • पत्रकारांच्या प्रश्नांसाठीचा लढा आणखी तीव्र करणार : संदीप काळे

Recent Comments

  1. vvhfntlqni on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. lsogddnnxq on नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण
  3. Kristian Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. shpnjwdonp on नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण
  5. Austen Web on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.