• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

उद्योजक अविनाश गडदे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाकडून नियमित जामीन मंजूर नामवंत विधीज्ञ ॲड. विशाल साखरे यांचा भक्कम युक्तिवाद ठरला निर्णायक

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 10, 2026
in क्राईम
0
उद्योजक अविनाश गडदे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाकडून नियमित जामीन मंजूर नामवंत विधीज्ञ ॲड. विशाल साखरे यांचा भक्कम युक्तिवाद ठरला निर्णायक
0
SHARES
409
VIEWS

उद्योजक अविनाश गडदे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाकडून नियमित जामीन मंजूर नामवंत विधीज्ञ ॲड. विशाल साखरे यांचा भक्कम युक्तिवाद ठरला निर्णायक

सोलापूर लोकविचार

सोलापूर येथील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात उद्योजक अविनाश गडदे यांना सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात धाराशिव जिल्ह्यातील नामवंत विधीज्ञ ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी केलेला सखोल आणि अभ्यासपूर्ण युक्तिवाद निर्णायक ठरल्याची चर्चा विधी क्षेत्रात होत आहे.
उद्योजक अविनाश गडदे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात ॲड. विशाल साखरे यांनी न्यायालयासमोर आरोपीची बाजू प्रभावीपणे मांडत अनेक महत्त्वपूर्ण कायदेशीर मुद्दे उपस्थित केले. त्यांनी युक्तिवादात नमूद केले की, प्रकरणात लावण्यात आलेल्या काही कलमांच्या लागू होण्याबाबत गंभीर कायदेशीर प्रश्न उपस्थित होतात. विशेषतः बीएनएस कलम ६९ संदर्भात सर्वोच्च न्यायालय व विविध उच्च न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांचा दाखला देत त्यांनी न्यायालयासमोर सविस्तर मांडणी केली.
ॲड. साखरे यांनी न्यायालयाला सांगितले की, दोन सज्ञान व्यक्तींमध्ये दीर्घकाळ परस्पर संमतीने संबंध असतील, तर प्रत्येक प्रकरणात त्याला फसवणुकीचे स्वरूप देणे योग्य ठरत नाही. सज्ञान व्यक्तींना योग्य-अयोग्य याची जाणीव असते आणि दीर्घकालीन प्रेमसंबंध तुटल्यानंतर निर्माण होणाऱ्या वादांकडे कायद्याच्या चौकटीत अत्यंत सावधपणे पाहणे आवश्यक आहे. यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांचे विविध न्यायनिर्णय त्यांनी न्यायालयासमोर सादर केले.
तसेच फिर्याद ही द्वेषातून व आरोपीला अडचणीत आणण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याची बाजूही त्यांनी न्यायालयात मांडली. संशयित आरोपीतने न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ॲड. विशाल साखरे यांच्या या सखोल, अभ्यासपूर्ण व कायदेशीरदृष्ट्या सक्षम युक्तिवादाची दखल घेत सोलापूर जिल्हा माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश केंद्रे यांनी अविनाश गडदे यांचा नियमित जामीन अर्ज मंजूर केला. त्यानंतर अविनाश गडदे यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
या प्रकरणात ॲड. विशाल साखरे यांना ॲड. खालेद खराडी, ॲड. मंजुषा साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड. अमित गोळे, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, .ॲड. संकेत गोरे, ॲड.ओंकार कोरेगावकर, ॲड. रोहित लोमटे आणि ॲड. प्रथम खोसरे यांनी सहकार्य केले.
दरम्यान, या प्रकरणातील जामीन मंजुरीनंतर विधी क्षेत्रात ॲड. विशाल साखरे यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीचे कौतुक होत असून, गुंतागुंतीच्या फौजदारी प्रकरणांमध्ये कायद्याचा सखोल अभ्यास, न्यायनिर्णयांचा प्रभावी वापर आणि भक्कम युक्तिवाद यांच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा आपली विधीज्ञ म्हणून असलेली ओळख अधोरेखित केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ लाख ५८ हजारांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त, एकावर गुन्हा दाखल!

Next Post

ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याचे वाहनतळ अस्वच्छतेच्या विळख्यात!

Related Posts

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला
क्राईम

मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

September 24, 2026
Next Post
ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याचे वाहनतळ अस्वच्छतेच्या विळख्यात!

ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याचे वाहनतळ अस्वच्छतेच्या विळख्यात!

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!