• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

“दर्शन बिअर बारच्या आड जुगाराचा गोरखधंदा…श्रीपाद वीरसह “या” ११ जणांना पोलिसांचा दणका

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 9, 2026
in क्राईम
0
“दर्शन बिअर बारच्या आड जुगाराचा गोरखधंदा…श्रीपाद वीरसह “या” ११ जणांना पोलिसांचा दणका
0
SHARES
2
VIEWS

“दर्शन बिअर बारच्या आड जुगाराचा गोरखधंदा…श्रीपाद वीरसह “या” ११ जणांवर पोलिसांचा दणका लाखोंचा मुद्देमाल जप्त

धाराशिव लोकविचार 

धाराशिव जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमेला मोठे यश मिळत असून धाराशिवजवळील अळणी येथे सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. लातूर-ढोकी रोडवरील ‘दर्शन बिअर बार अँड परमिट रूम’ च्या आडोशाने चालणाऱ्या तीन पत्ती (तिरट) क्लबवर छापा टाकून पोलिसांनी १२ संशयितांना ताब्यात घेत तब्बल २१ लाख ९० हजार ३०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 पोलीस अधीक्षक रीतु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ८ जून २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली. परिमंडळ पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे विशेष पथकाने अळणी येथील दर्शन बिअर बारवर नियोजनबद्ध छापा टाकला.

मिळालेल्या माहितीनुसार, बारच्या मागील बाजूस चहूबाजूंनी शेताने वेढलेल्या जागेत पैशांच्या बदल्यात कॉईन्स देऊन मोठ्या प्रमाणात जुगार खेळवला जात होता. हे ठिकाण मुख्य रस्त्यापासून दूर असल्याने सहजासहजी कोणाच्या नजरेस पडत नव्हते. मात्र पोलिसांनी अत्यंत शिताफीने नियोजन करून अड्ड्याला घेराव घातल्याने संशयितांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी, सुरेश कासुळे, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र बहुरे, क्यूआरटी (QRT), आरसीपी (RCP) पथकातील अंमलदार व चालकांनी सहभाग घेतला.

छापेमारीदरम्यान पोलिसांनी जुगारासाठी वापरण्यात येणारे पत्ते, कॉईन्स, मोबाईल फोन, दोन चारचाकी वाहने, चार दुचाकी वाहने तसेच इतर साहित्य जप्त केले. एकूण रु. २१,९०,३०५ इतक्या रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणात बार मालक श्रीपाद नारायण वीर याच्यासह, उमाकांत महादेव गाडे, शहाजी दादासाहेब अकोसकर, पांडुरंग वसंत भांगे, रमेश राजेंद्र पवार, रमेश नवनाथ गव्हाड, सोमनाथ गोवर्धन खोत, कृष्णा महादेव गाडे, शरद श्रीमंत जाधव, नागेश सुबराव पवार, आकाश श्रीरंग पवार, एजाज चांद शेख, वैभव विनायक रोंधवे आणि श्रीपाद नारायण वीर  अशा एकूण १२ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या संदर्भात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बनसोडे करीत आहेत.

अळणी परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार व्यवसायावर झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे जुगार अड्डे चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले असून जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्यांना पोलिसांनी कडक इशारा दिल्याची चर्चा सुरू आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाअवैध धंदेआळणीक्लबजुगारधाराशिवपोलिस अधिक्षक
Previous Post

तहसीलदारांच्या नावाने सामान्य नागरिकांची फसवणूक करणारा भामटा जाळ्यात

Next Post

“दर्शन बिअर बारच्या आड जुगाराचा गोरखधंदा…श्रीपाद वीरसह “या” ११ जणांवर पोलिसांचा दणका

Related Posts

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला
क्राईम

मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

September 24, 2026
Next Post
“दर्शन बिअर बारच्या आड जुगाराचा गोरखधंदा…श्रीपाद वीरसह “या” ११ जणांवर पोलिसांचा दणका

"दर्शन बिअर बारच्या आड जुगाराचा गोरखधंदा...श्रीपाद वीरसह "या" ११ जणांवर पोलिसांचा दणका

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!