• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

अपूर्ण पाणीपुरवठा योजनेवरून आळणी ग्रामस्थ आक्रमक!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 20, 2026
in महाराष्ट्र
0
अपूर्ण पाणीपुरवठा योजनेवरून आळणी ग्रामस्थ आक्रमक!
0
SHARES
114
VIEWS

अपूर्ण पाणीपुरवठा योजनेवरून आळणी ग्रामस्थ आक्रमक!

“नळांना पाणी नाही, गावात सांडपाण्याचे साम्राज्य”; प्रशासनाविरोधात गावकऱ्यांचा संताप

धाराशिव लोकविचार 

धाराशिव तालुक्यातील मौजे आळणी येथील अपूर्ण पाणीपुरवठा योजना तात्काळ पूर्ण करण्यात यावी तसेच गावातील सांडपाणी व्यवस्थापन, नालेसफाई व नालेदुरुस्तीची कामे त्वरित हाती घ्यावीत, या मागण्यांसाठी आळणी ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन दिले आहे.

याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर यांना ग्रामस्थांच्या स्वाक्षरीसह देण्यात आले.

गावामध्ये अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा योजना अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे गावातील नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचत असून दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

पावसाळा तोंडावर असताना नालेसफाई व नालेदुरुस्तीची कामे रखडल्याने गावात साथीच्या रोगांचा धोका निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सोडवला नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

यावेळी अभयसिंह वीर, अशोक गाडे, विश्वजीत पाटील, युवराज कोळी, अजय गाडे, रियाज सय्यद, शुभम महामुनी आदींच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.

दरम्यान, पाणीपुरवठ्याचा विषय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडण्यात येईल तसेच नालेसफाई व संबंधित इतर कामे पावसाळ्यापूर्वी करण्याच्या सूचना आरोग्य विभागामार्फत दिल्या जातील, असे आश्वासन प्रियंवदा महाडदळकर यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.

तथापि, केवळ आश्वासनांवर समाधान नसून कामे प्रत्यक्षात सुरू झाली नाहीत तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलआळणीउस्मानाबादजिल्हा परिषद धाराशिवजिल्हाधिकारी कार्यालय धाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपाणी टंचाईपालकमंत्री प्रतापराव सरनाईक
Previous Post

धाराशिव जिल्ह्यात खळबळ! कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

Next Post

११ दिवसांपासून पाणीटंचाई; सत्ताधारी-विरोधकांच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा सवाल, सुरज साळुंके यांचा नगरपालिकेत धडक देत आंदोलनाचा इशारा

Related Posts

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र

आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

August 20, 2026
Next Post
११ दिवसांपासून पाणीटंचाई; सत्ताधारी-विरोधकांच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा सवाल, सुरज साळुंके यांचा नगरपालिकेत धडक देत आंदोलनाचा इशारा

११ दिवसांपासून पाणीटंचाई; सत्ताधारी-विरोधकांच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा सवाल, सुरज साळुंके यांचा नगरपालिकेत धडक देत आंदोलनाचा इशारा

ताज्या घडामोडी

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!