• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव एलसीबीची धाडसी मोहीम फत्ते; 10 कोटींच्या हशिश ऑईल तस्करीतील मुख्य आरोपी ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून जेरबंद

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 10, 2026
in क्राईम
0
धाराशिव एलसीबीची धाडसी मोहीम फत्ते; 10 कोटींच्या हशिश ऑईल तस्करीतील मुख्य आरोपी ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून जेरबंद
0
SHARES
123
VIEWS

धाराशिव एलसीबीची धाडसी मोहीम फत्ते; 10 कोटींच्या हशिश ऑईल तस्करीतील मुख्य आरोपी ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून जेरबंद

धाराशिव लोकविचार

नळदुर्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तब्बल 10 कोटी 38 लाख 20 हजार रुपये किमतीच्या हशिश ऑईल तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपीला ओडिशा राज्यातील अतिशय दुर्गम व नक्षलप्रभावित पहाडी भागातून ताब्यात घेत स्थानिक गुन्हे शाखेने धाडसी मोहीम यशस्वी केली आहे. या कारवाईमुळे धाराशिव पोलिसांच्या तांत्रिक तपास कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.दि. 19 एप्रिल 2026 रोजी रात्री नळदुर्ग परिसरात नाकाबंदी सुरू असताना पोलिसांना पाहून अमली पदार्थ तस्करांनी त्यांच्या ताब्यातील हशिश ऑईलने भरलेली बॅग कारमधून फेकून पळ काढला होता. त्यानंतर नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात हशिश ऑईल जप्त करत पोलीस स्टेशन नळदुर्ग येथे गुन्हा क्रमांक 114/2026 अंतर्गत NDPS Act कलम 8(क), 20(ब), 20(ii)(C), 25 व 29 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. तांत्रिक तपासादरम्यान दोन आरोपींना यापूर्वी नाशिक-मालेगाव परिसरातून अटक करण्यात आली होती. मात्र, हशिश ऑईलचा मुख्य पुरवठादार आणि विक्रेता अद्याप फरार होता.तपासादरम्यान पोलिसांना ओडिशा राज्यातील प्रसेनजित ख्रिमहन दास हा या रॅकेटमधील मुख्य आरोपी असल्याची माहिती मिळाली. मात्र, त्याचे वास्तव्य, ओळख आणि हालचालींबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.दि. 06 मे 2026 रोजी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, चापो हवालदार महेबुब अरब व रोहित दंडनाईक यांचे विशेष पथक ओडिशा राज्यात रवाना करण्यात आले.तांत्रिक माहिती आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीने आरोपी हा ओडिशातील जनतापाई या अतिशय दुर्गम, पहाडी आणि नक्षलप्रभावित भागात राहत असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांनी दिलेल्या विशेष सूचना आणि मार्गदर्शनानुसार पथकाने अत्यंत धाडसी कारवाई करत दि. 08 मे 2026 रोजी आरोपी प्रसेनजित ख्रिमहन दास (वय 33, रा. ओडिशा राज्य) याला यशस्वीरित्या ताब्यात घेतले.सदर आरोपीस पुढील कार्यवाहीसाठी नळदुर्ग पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून या प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या या धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे धाराशिव पोलिसांचे राज्यभरातून कौतुक होत असून, अमली पदार्थ तस्करीविरोधातील पोलिसांची आक्रमक भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलआमदार राणाजगजितसिंह पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनळदुर्ग पोलिस
Previous Post

शिराढोण पोलिसांची मोठी कारवाई  ताडगाव-रांजणी शिवारात थरारक पाठलाग; बकरी चोरी प्रकरणी तीन आरोपींसह मुद्देमाल जप्त

Next Post

भाजपा नेते नितीन काळे यांची मराठवाडा संयोजकपदी निवड; नगरसेवक विलास (बापू) लोंढे यांच्या हस्ते सत्कार

Related Posts

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;
क्राईम

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ
क्राईम

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
क्राईम

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;
क्राईम

मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;

August 25, 2026
चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

August 25, 2026
गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे
क्राईम

गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे

August 24, 2026
Next Post
भाजपा नेते नितीन काळे यांची मराठवाडा संयोजकपदी निवड; नगरसेवक विलास (बापू) लोंढे यांच्या हस्ते सत्कार

भाजपा नेते नितीन काळे यांची मराठवाडा संयोजकपदी निवड; नगरसेवक विलास (बापू) लोंढे यांच्या हस्ते सत्कार

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!