• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

कानफुके रील स्टार सभापतीनीचे शहराकडे दुर्लक्ष!“अनधिकृत होर्डिंग रस्त्यावर कोसळून अपघातांना निमंत्रण

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
April 19, 2026
in क्राईम
0
कानफुके रील स्टार सभापतीनीचे शहराकडे दुर्लक्ष!“अनधिकृत होर्डिंग रस्त्यावर कोसळून अपघातांना निमंत्रण
0
SHARES
516
VIEWS

कानफुके रील स्टार सभापतीनीचे शहराकडे दुर्लक्ष!“अनधिकृत होर्डिंग रस्त्यावर कोसळून अपघातांना निमंत्रण; आता तरी प्रशासन जागे होणार का?” अनधिकृत होर्डिंगमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ

धाराशिव | सर्वसामान्य लोकविचार

धाराशिव शहरात अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेक वर्षांपासून गाजत असलेल्या या मुद्द्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. विशेषतः शहर स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या सभापतींवरच बोट ठेवत, “कामापेक्षा रील्समध्येच वेळ जातो,” अशी टीका नागरिकांतून होत आहे.भारतीय जनता पक्षाने नगर परिषदेत एकहाती सत्ता स्थापन केल्यानंतर पहिल्याच सर्वसाधारण सभेत शहरात होर्डिंगसाठी ठराविक जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. तसेच अनधिकृत होर्डिंग आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात हे सर्व निर्णय केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.आज झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे शहरातील अनेक अनधिकृत होर्डिंग थेट रस्त्यावर कोसळले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी काही ठिकाणी नागरिक किरकोळ जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे, तर वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. प्रमुख चौकांसह गजबजलेल्या भागांतही नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आलेल्या होर्डिंगमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज चौकासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी होर्डिंग लावण्यास बंदी असतानाही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे उघड झाले आहे. शहरातील विविध भागांत कोणतीही मजबुती न करता तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेली ही होर्डिंग वाऱ्याच्या झोताला न टिकता कोसळत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.दरम्यान, इतर विभागांत हस्तक्षेप करणारे आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेले संबंधित सभापती स्वतःच्या विभागाकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याची टीका जोर धरत आहे. “नियम फक्त कागदावरच का?” असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.नागरिकांनी प्रशासनाला इशारा देत, “आता तरी अनधिकृत होर्डिंग तात्काळ हटवावीत व संबंधित मालकांवर कडक कारवाई करावी. अन्यथा एखादी जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे.

सर्वसामान्य लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

दोन महिन्यांपासून पगार रखडला; आश्रमशाळा शिक्षकांचा संताप अनावर मुख्यमंत्र्यांना निवेदन

Next Post

हजरत खाजा शमशोद्दीन गाजी रहे. वेलफेअर सोसायटी उस्मानाबाद च्या सामुदायीक विवाह सोहळ्यात १२ जोडप्यांनी बांधल्या रेशीम गाठी

Related Posts

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला
क्राईम

मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

September 24, 2026
Next Post
हजरत खाजा शमशोद्दीन गाजी रहे. वेलफेअर सोसायटी उस्मानाबाद च्या सामुदायीक विवाह सोहळ्यात १२ जोडप्यांनी बांधल्या रेशीम गाठी

हजरत खाजा शमशोद्दीन गाजी रहे. वेलफेअर सोसायटी उस्मानाबाद च्या सामुदायीक विवाह सोहळ्यात १२ जोडप्यांनी बांधल्या रेशीम गाठी

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!