• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

“आदर्श शिंदेच्या बुलंद भीमगीतांनी धाराशिव दणाणले; भाजपाच्या भीम महोत्सवाला अभूतपूर्व जनसागर, ‘जय भीम’च्या घोषात शहर झाले भीममय!”

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
April 17, 2026
in महाराष्ट्र
0
“आदर्श शिंदेच्या बुलंद भीमगीतांनी धाराशिव दणाणले; भाजपाच्या भीम महोत्सवाला अभूतपूर्व जनसागर, ‘जय भीम’च्या घोषात शहर झाले भीममय!”
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आदर्श शिंदेंच्या पहाडी सुरांनी धाराशिव ‘भीममय’भाजपाच्या भीम महोत्सवाला जनसागराचा

: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून धाराशिव नगरीत क्रांतीच्या सुरांचा अभूतपूर्व सोहळा रंगला. महाराष्ट्राचा लाडका गायक आदर्श शिंदे यांच्या बुलंद आणि थरारक आवाजाने संपूर्ण जिल्हा परिषद मैदान दणाणून गेले. निमित्त होते, आमदार राणाजगजितसिंह पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या प्रेरणेतून मल्हार पाटील आणि सौ. साक्षी मल्हार पाटील यांनी आयोजित केलेल्या ‘भीम महोत्सवा’चे. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाली. आदर्श शिंदे यांनी आपल्या पहाडी आवाजात भीमगीते सादर करताच, हजारोंच्या संख्येने उपस्थित भीम अनुयायांनी ‘जय भीम’चा जयघोष केला. प्रत्येक गीतातून मिळणारी प्रेरणा आणि समतेच्या विचारांनी उपस्थितांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित केली. हा केवळ संगीताचा कार्यक्रम न ठरता, समाज परिवर्तनाचा एक जिवंत जागर ठरला. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे भाजप युवा नेते मल्हार पाटील यांचा सक्रिय सहभाग. लेडीज क्लबच्या माध्यमातून आजवर अनेक कार्यक्रम झाले, मात्र मल्हार व डॉ. साक्षी पाटील यांच्या पुढाकारातून प्रथमच एवढ्या भव्य दिव्य स्वरूपात भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यांच्या या पहिल्याच प्रयत्नाला धाराशिवकरांनी उदंड प्रतिसाद देत हा सोहळा यशस्वी केला. कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांच्या गर्दीने मैदान फुलून गेले होते. “प्रत्येक शब्दात अभिमान आणि प्रत्येक ठेक्यात क्रांती” असा अनुभव घेत तरुणाईने या गीतांवर ताल धरला. जिल्ह्याच्या सांस्कृतिक इतिहासात हा कार्यक्रम एक मैलाचा दगड ठरला असून, बाबासाहेबांच्या विचारांचे नवचैतन्य या माध्यमातून घराघरात पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Tags: dharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

पत्रकारांना दूर ठेवत विशेष पोलीस महानिरीक्षकांचा धाराशिव दौरा दरवेळी संवाद टाळत असल्याने तीव्र नाराजी

Next Post

नारीशक्तीविरोधी भूमिकेवर काँग्रेस-इंडिया आघाडीचा शिवसेना महिला आघाडीचा धाराशिवमध्ये जाहीर निषेध

Next Post
नारीशक्तीविरोधी भूमिकेवर काँग्रेस-इंडिया आघाडीचा शिवसेना महिला आघाडीचा धाराशिवमध्ये जाहीर निषेध

नारीशक्तीविरोधी भूमिकेवर काँग्रेस-इंडिया आघाडीचा शिवसेना महिला आघाडीचा धाराशिवमध्ये जाहीर निषेध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • एस टी महामंडळाच्या जनजागृती ब्रँड ॲम्बेसेडरपदी रितेश – जेनेलिया देशमुख – परिवहनमंत्री सरनाईक
  • “जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ‘तळे’! नागरिकांना पर्यायी वाटांचा शोध”
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आज भव्य मिरवणूक
  • नगर परिषदेतील बालवाडी शिक्षकांना कायम सेवेत समावेशन करण्याची मागणी
  • कला केंद्र सील; शेकडो महिलांवर उपासमारीची वेळ – प्रशासनाकडून पुनर्वसनाची ग्वाही!

Recent Comments

  1. Gunner SEO on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Darrell Camarillo on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Hassan Clint on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Brittany Joslyn on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. John Loh on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.