• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

कामगारच ठरला दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ४२  हजारांच्या मुद्देमालासह  २ आरोपी जेरबंद

wp@dktechs.in by wp@dktechs.in
April 1, 2026
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

कामगारच ठरला दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ४२  हजारांच्या मुद्देमालासह  २ आरोपी जेरबंद

नळदुर्ग | लोकमदत न्यूज प्रतिनिधी अझहर शेख

दाळींब येथील सोलापूर-हैदराबाद महामार्गावर घडलेल्या दरोडा प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांनी अवघ्या काही दिवसांत उलगडा करत दोन आरोपींना जेरबंद केले आहे. या प्रकरणात विशेष बाब म्हणजे, फिर्यादीच्या संपर्कात असलेलाच एक कामगार दरोडेखोर निघाल्याचे उघड झाले आहे.
दि. २८ मार्च २०२६ रोजी फिर्यादी हृषिकेश जाधव (रा. लातूर) हे मुरूम येथून माल उतरवून मिळालेली १ लाख १४ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन जात असताना दाळींब येथे सहा अज्ञात इसमांनी त्यांची गाडी अडवून मारहाण केली व रक्कम लुटून नेली होती. या प्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झाले. दि. ३१ मार्च रोजी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी अभिषेक राजेंद्र कावडे (वय १९, रा. कंटेकूर) हा मुरूम येथील उज्वला किराणा दुकानात काम करत होता. फिर्यादीकडील मोठी रोख रक्कम पाहून त्याने आपल्या साथीदारांना माहिती दिली आणि दरोड्याचा कट रचला. त्यानंतर आरोपींनी मोटारसायकल व पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारच्या साहाय्याने फिर्यादीचा पाठलाग करून महामार्गावर गाडी अडवली. फिर्यादी व चालकाला मारहाण करून त्यांच्याकडील १,१४,००० रुपयांची रक्कम लुटली.
या प्रकरणात अभिषेक कावडे व दत्ता व्यंकट जमादार (वय ३३, रा. कंटेकूर, ता. उमरगा) या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून २० हजार रुपये रोख व दोन मोबाईल असा एकूण ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उर्वरित सहा आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

धाराशिवात डीजेवर कडक बंदी पोलिसांचा मोठा निर्णय, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई अटळ!

Next Post

लोकमदत न्यूजचा पुन्हा दणका! धाराशिव बसस्थानकात ‘पास लूट’ पूर्णपणे बंद नवीन मशीनद्वारे पारदर्शक सेवा लवकरच ज्येष्ठ व दिव्यांगांकडून समाधान व्यक्त

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post

लोकमदत न्यूजचा पुन्हा दणका! धाराशिव बसस्थानकात ‘पास लूट’ पूर्णपणे बंद नवीन मशीनद्वारे पारदर्शक सेवा लवकरच ज्येष्ठ व दिव्यांगांकडून समाधान व्यक्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!