• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

लाडक्या बहिणींच्या अर्जांतील त्रुटी मिशन मोडवर दूर करा आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे प्रशासनाला निर्देश

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 21, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS


लाडक्या बहिणींच्या अर्जांतील त्रुटी मिशन मोडवर दूर करा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे प्रशासनाला निर्देश

धाराशिव / लोकमदत न्यूज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक पात्र बहिणीला मिळालाच पाहिजे, त्यासाठी आता जिल्हा प्रशासनाला ‘मिशन मोड’वर लाडक्या बहिणींच्या अर्जातील तांत्रिक त्रुटी आणि चुकीच्या माहितीमुळे रखडलेली ३८ हजार ८११ बहिणींची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आता प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.

जिल्ह्यात मोठ्या संख्येने माता भगिनींनी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज केले आहेत. मात्र, तब्बल ३८ हजार ८११ अर्जांमध्ये माहिती भरताना चुका झाल्याचे समोर आले आहे. यामुळे या माता भगिनींची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. पर्यायाने त्यांच्या बँक खात्यात योजनेचे पैसे जमा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. हक्काच्या आर्थिक मदतीपासून लाडक्या बहिणी वंचित राहू नयेत, यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्याबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी निर्देश दिले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पूजार यांना हे प्रकरण प्राधान्याने हाताळण्याच्या सूचना दिल्या. प्रशासनाने याची तत्काळ दखल घेतली असून, शनिवारी या संबंधित सर्व यंत्रणांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत प्रलंबित ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करून करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले जाणार आहेत.


एकाही पात्र भगिनी वंचित राहता कामा नये : आमदार पाटील

जिल्ह्यातील अनेक माता-भगिनी केवळ तांत्रिक कारणास्तव योजनेच्या लाभापासून वंचित आहेत, हे चिंताजनक आहे. प्रशासनाने समन्वयाने काम करून या त्रुटी लवकरात लवकर दूर कराव्यात. महिलांनीही आपल्या गावातील ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधून आपले ई-केवायसी अपडेट करून घ्यावे असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

Previous Post

अजितदादांच्या सासरवाडीत नगर परिषदेत पडला विसर !श्रद्धांजली अर्पण करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये का नाही ?

Next Post

आंबेवाडी येथील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करा – सभासदांसह ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post

आंबेवाडी येथील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करा – सभासदांसह ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!