• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव शहरातील सिग्नल पुन्हा ‘दुरुस्ती’च्या नावाखाली खर्चाचा खेळ? “दर काही महिन्यांनी निविदा, पण सिग्नल मात्र कायम बंद!”

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 1, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव शहरातील सिग्नल पुन्हा ‘दुरुस्ती’च्या नावाखाली खर्चाचा खेळ?
“दर काही महिन्यांनी निविदा, पण सिग्नल मात्र कायम बंद!”
धाराशिव (प्रतिनिधी) :धाराशिव शहरातील वाहतूक व्यवस्थेचा कणा मानले जाणारे सिग्नल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले हे सिग्नल पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली सुरू करण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. शहरातील जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत (सेंट्रल बिल्डिंग) चौक, जिल्हा न्यायालय समोरील लहुजी वस्ताद साळवे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शहर पोलिस स्टेशन शेजारील संत गाडगेबाबा महाराज चौक आणि जिजाऊ चौक (बार्शी नाका) या ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले होते. मात्र हे सिग्नल सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, आजतागायत एकदाही नियमितपणे कार्यान्वित झालेले नाहीत.
प्रशासनाकडून लाखो रुपयांचा खर्च करून हे सिग्नल बसविण्यात आले. मात्र वारंवार दुरुस्तीचे काम, निविदांची प्रक्रिया आणि नव्याने कंत्राटदार नेमण्याची पद्धत सुरुच आहे. दर चार, सहा महिन्यांनी किंवा वर्षाखाली सिग्नल दुरुस्तीच्या नावाखाली निविदा काढली जाते, काम सुरू होते; पण सिग्नल मात्र बंदच राहतात.
नागरिकांनी या संदर्भात वारंवार तक्रारी केल्या, वृत्त माध्यमांतून प्रश्न उपस्थित केले, परंतु प्रशासनाकडून केवळ “दुरुस्ती सुरू आहे” एवढाच प्रतिसाद मिळत आहे. “प्रशासन निविदा काढून नेमकं करतंय तरी काय?” असा सवाल उपस्थित होत आहे.
सत्ताधारी व विरोधक दोघेही या विषयावर मौन बाळगून आहेत. ज्या ठिकाणी राजकीय किंवा आर्थिक स्वार्थ नसतो, तेथे प्रशासनाविरोधात कोणीही आवाज उठवत नाही. परिणामी शहरातील नागरिकांना वाहतुकीतील गोंधळ आणि अपघाताचा धोका सहन करावा लागत आहे.
दरम्यान, आज पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सिग्नल दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. मात्र हे केवळ दुरुस्तीपुरतेच आहे का, की या वेळी सिग्नल खरोखरच सुरू होणार आहेत. याचे उत्तर फक्त प्रशासनच देऊ शकते.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectorjilhadhikari dharashivआंदोलनआमदार कैलास पाटीलआमदार राणाजगजितसिंह पाटीलउस्मानाबादखासदार ओमप्रकाश राजे निंबाळकरधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव शहर वाहतूक शाखानगर परिषद धाराशिवनगर परिषद मुख्याधिकारीपोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिवमोर्चाराजकारणराजकीय नेते
Previous Post

जिल्ह्यातील शिवसेना(शिंदे गट) आणि उबाठा एकाच नाण्याच्या दोन बाजू  – ॲड. नितीन भोसले

Next Post

अंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश! पोलिस अधीक्षक रीतु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे मोठे यश

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post

अंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश! पोलिस अधीक्षक रीतु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे मोठे यश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!