• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

विकासकामे करताना सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या… खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 3, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव,दि.३ सप्टेंबर (प्रतिनिधी)  जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून विविध योजना,प्रकल्प व उपक्रम राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येतो.त्याचा उपयोग शाश्वत विकासासाठी करण्यात येतो.विकास योजनांची आखणी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींचा सहभाग राहिल्यास योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचू शकेल,यासाठी अधिकाऱ्यांनी कोणतेही विकासकामे करताना सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून  करावे.असे निर्देश खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी  आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित दिशा समितीच्या आढावा बैठकीत दिले.

यावेळी धाराशिव-कळंबचे आमदार कैलास घाडगे-पाटील,उमरगा- लोहाराचे आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव,ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

खा.राजेनिंबाळकर पुढे म्हणाले की,
जनतेच्या हिताशी संबंधित प्रकल्पांची गतीमान अंमलबजावणी करताना पारदर्शकता व समन्वय याला प्राधान्य दिले पाहिजे.जिल्ह्यातील पायाभूत सुविधा,रस्ते,पाणीपुरवठा,राष्ट्रीय महामार्ग,रेल्वे मार्ग,आरोग्य आणि कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक कामे प्राधान्याने सुरू आहेत.या कामांमध्ये जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी व तक्रारी कमी करण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने पावले उचलावी. जनतेचा विश्वास हा विकासाचा पाया आहे.सर्व पातळ्यांवर समन्वय साधूनच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य होईल.जिल्ह्यातील सर्व प्रकारची विकासकामे राबविताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणे अत्यंत आवश्यक आहे.जनतेच्या हिताशी संबंधित कोणतेही काम पारदर्शकतेने व सर्वांचा सहभाग सुनिश्चित करूनच पूर्ण करण्यात यावे,असे त्यांनी सांगितले.

केंद्र शासनामार्फत जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असल्याने सांगून राजेनिंबाळकर म्हणाले की,या निधीचा योग्य वापर करून शाश्वत व गुणवत्तापूर्ण विकास साधणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.मात्र,यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असून त्यांच्या मार्गदर्शनानेच विकासकामे प्रभावीपणे राबविता येतील.जनतेच्या समस्या प्रत्यक्ष ओळखून त्यावर उपाययोजना करणे हा लोकप्रतिनिधींचा अनुभव प्रशासनासाठी उपयुक्त ठरतो.त्यामुळे कोणतेही काम एकतर्फी न करता सर्व घटकांचा सहभाग असणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.

खा.राजेनिंबाळकर म्हणाले की, जनतेला थेट लाभ होणाऱ्या योजनांना प्राधान्य देऊन त्या कामांची गती वाढवावी.तसेच,सुरू असलेल्या कामांमध्ये विलंब होणार नाही याची दक्षता घेणे प्रशासनाची जबाबदारी आहे.जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर राजकीय व प्रशासकीय समन्वय अत्यंत आवश्यक आहे.प्रत्येक प्रकल्पात जनतेचा विश्वास महत्त्वाचा असून, त्याच आधारे आपण अधिक परिणामकारक कामगिरी करू शकतो.या बैठकीत विविध विभाग प्रमुख,संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: dharashivosmanabadआढावा बैठकआमदार कैलास पाटीलउस्मानाबादखासदार ओमप्रकाश राजे निंबाळकरजिल्हाधिकारी कार्यालयदिशा समिती
Previous Post

वाशी गावातून मराठा समाजाचा जल्लोष – कुणबी प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण..!

Next Post

भांडगाव स्मशानभूमीवर बेकायदेशीर अतिक्रमण व बांधकाम त्वरित थांबवा! रिपाइं (खरात)पक्षाची मागणी

Related Posts

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र

आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

August 20, 2026
Next Post

भांडगाव स्मशानभूमीवर बेकायदेशीर अतिक्रमण व बांधकाम त्वरित थांबवा! रिपाइं (खरात)पक्षाची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!