• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

शिवसेना नेते आ.तानाजीराव सावंत यांची भाजप पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट जिल्ह्यात वेगळ्याच चर्चेला उधाण…

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 3, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिवसेना नेते तानाजीराव सावंत यांची भाजप पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट जिल्ह्यात वेगळ्याच चर्चेला उधाण… धाराशिवच्या रस्ता निविदा वादाला नवे वळण?
धाराशिव दि. ०३ (प्रतिनिधी):
पुणे येथील कात्रज परिसरातील संपर्क कार्यालयात शिवसेना (शिंदे गट) नेते, माजी पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रा. डॉ.तानाजीराव सावंत यांची भाजप पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य, तसेच नेते नितीन काळे उपस्थित होते.
मात्र, ही भेट केवळ सदिच्छा म्हणून घेतली का, की धाराशिवच्या १४० कोटींच्या रस्ता निधी व निविदा वादाशी संबंधित काही गुप्त चर्चाही झाल्या, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
माजी पालकमंत्री तथा भूम परंडा वाशी चे आमदार सावंत यांनी यांच्या काळात विशेष लक्ष घालून मंजूर घेतलेल्या १४० कोटींच्या निधीतील कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. या कामांमध्ये अनियमितता असल्याचा ठपका ठेवून विद्यमान पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी संबंधित निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार राणाजीतसिंह पाटील यांनी या निधीच्या मंजुरीसाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल शहरात सत्कार सोहळेही झाले होते, मात्र नगरविकास विभागाच्या हस्तक्षेपानंतर तो आनंद फिकाच ठरला.
आज मंत्रालयात या कामासंदर्भात बैठक होण्यापूर्वीच भाजप नेत्यांची सावंत यांच्याशी घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे.
तर “ही भेट विकासकामातील तणाव शमवण्यासाठी की नव्या राजकीय समीकरणाची पूर्वतयारी आहे?”
याबाबत सावंत किंवा भाजप पदाधिकाऱ्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही, मात्र या भेटीने धाराशिवच्या राजकारणात नवीन चर्चेला जोर चढला आहे.

एककडे शहरातील अंतर्गत रस्त्याच्या स्थगितीच्या मुद्द्यावरून पालकमंत्री प्रताप सरनाईक व भाजप आमदार राणा पाटील हे एकमेकांसमोर उभा टाकलेत त्यातच आता भारतीय जनता पार्टी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी तानाजी सावंत यांच्याबरोबर येणाऱ्या नगरपालिका निवडणुका जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेऊन मिळवण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना अशी चर्चा या भेटीच्या निमित्ताने केली जात आहे
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv liveआमदार कैलास पाटीलआमदार तानाजीराव सावंतआमदार प्रवीण स्वामीआमदार राणाजगजितसिंह पाटीलखासदार ओम प्रकाश राजे निंबाळकरजिल्हाधिकारी कार्यालयधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनगर परिषद मुख्याधिकारीभारतीय जनता पक्षराजकारणराजकीय नेतेशिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेस्थगिती
Previous Post

“महिला नेतृत्वाला नवा उभारी – अंबेजवळगा मतदारसंघात वहिदा कलीम सय्यद चर्चेच्या केंद्रस्थानी!”

Next Post

भरदिवसा व्यावसायिकाला लुटणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

Next Post

भरदिवसा व्यावसायिकाला लुटणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.