• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

15 ऑगस्टच्या ग्रामसभेत घ्यावा कर्जमाफी मागणीचा ठराव -आमदार कैलास पाटील

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 13, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव ता 13: सरसकट कर्जमाफी मागणीचा 15 ऑगस्ट च्या ग्रामसभेत ठराव घ्यावा,जिल्ह्यातील सर्व ठराव एकत्र करून ते मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी ग्रामसभेला हजेरी लावून हा ठराव घ्यावा असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले आहे.
आमदार पाटील म्हणाले की, 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या  ग्रामसभेच्या माध्यमातून शेतकरी व ग्रामस्थांच्यावतीने सामूहिक निवेदन करून शासनाला कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून द्यायची आहे. निवडणूकीत सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व तेव्हाच्या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. पण तीन अधिवेशने होवून ही या विषयावर कोणताही निर्णय  सरकारने घेतलेला नाही.राज्यातील शेतकरी सततच्या नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट,  उत्पादन खर्चातील वाढ महागडी खते औषधे यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. पिकांचे भाव हमीभावापेक्षा कमी मिळत असून, उत्पादन खर्च वसूल करणे देखील कठीण झाले आहे. शेतकरी व ग्रामीण भागाचे उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या शेतीतील उत्पन्नाला हमीभाव ,योग्य बाजार नसल्याने बहुतांश शेतकरी बँक व सावकारांकडील कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. अनेकांना थकबाकीमुळे नोटिसा, जप्ती कारवाई, काहींकडून तर आत्महत्येचे टोकाचे निर्णय घेतले जात आहेत. दिवसेंदिवस त्याचे आकडे वाढत आहेत.
या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सरसकट कर्जमाफी हीच तातडीची व परिणामकारक उपाययोजना आहे. ही कर्जमाफी सर्व प्रकारच्या कर्जांवर, यामध्ये थकबाकीदार, चालू बाकीदार यांच्यासह अल्प मुदतीचे पीककर्ज, मध्यम मुदतीचे सिंचन व उपकरण कर्ज, शेडनेट, पॉलिहाऊस, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेले तसेच सावकारी कर्ज यात समाविष्ट करावा. समिती, निकष व अभ्यास यामध्ये वेळ न घालवता सरकारने तातडीने कर्जमाफी करावी अशा प्रकारचा ठराव शेतकऱ्यांनी ग्रामसभेत मांडावा असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
या आहेत मागण्या :
1. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करावी.
2. कर्जमाफीची अंमलबजावणी बिनशर्त, पारदर्शक व त्वरित करावी.
3. कर्जमाफीसह शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन शाश्वत शेती धोरण लागू करावे.
आपण तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन राज्यातील शेतकरी वर्गाला कर्जमाफीचा दिलासा द्यावा.

Tags: dharashiwosmanabadआमदारउस्मानाबादकृषीकैलास पाटीलग्रामसभामहाराष्ट्रशेतकरी कर्जमाफीस्वातंत्र्य दिन
Previous Post

रक्षाबंधन निमित्त प्रवासी वाहतुकीतून एसटीला १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न – परिवहनमंत्री सरनाईक

Next Post

धाराशिव प्रशालेत ध्वजारोहण; विविध देशभक्तीपर उपक्रमांनी उत्साहाचा जल्लोष

Related Posts

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post

धाराशिव प्रशालेत ध्वजारोहण; विविध देशभक्तीपर उपक्रमांनी उत्साहाचा जल्लोष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!