• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यावर महिला शिपायाचे गंभीर आरोप – गुन्हा दाखल करण्याची मागणी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 27, 2025
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यावर महिला शिपायाचे गंभीर आरोप – गुन्हा दाखल करण्याची मागणी

स्थानिक पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याने महिला शिपाई कर्मचाऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे धाव!

धाराशिव दि.२७ (प्रतिनिधी):धाराशिव जिल्हा कारागृहात कार्यरत असलेले पीडित महिला शिपाई यांनी आपल्या वरिष्ठ तुरुंग अधिकारी लहू रावसाहेब सांगळे यांच्यावर विनयभंग, अश्लील भाषेत बोलणे, मानसिक छळ तसेच नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिल्याचे गंभीर आरोप केले असून याबाबत त्यांनी २५ सप्टेंबर रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. मात्र, आरोपी अधिकारी वरिष्ठ पदावर असल्याने पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी तत्काळ गुन्हा दाखल न करता केवळ चौकशी करून निर्णय घेऊ असे सांगून तक्रारीची नोंद टाळल्याचे पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारी अर्जात नमूद केले आहे. या निष्काळजीपणाविरोधात पीडित महिला कर्मचारी यांनी थेट पोलीस अधीक्षक धाराशिव यांच्याकडे धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
महिला कर्मचारी यांनी तक्रारी अर्जात नमूद केले आहे की, जून २०२५ मध्ये सांगळे तुरुंगाधिकारी श्रेणी एक म्हणून रुजू झाल्यापासून ते सतत अश्लील हावभाव, एकटक बघणे, अपमानास्पद भाषा वापरणे आणि वारंवार बंगल्यावर बोलावण्याचा दबाव टाकत आहेत. ४ व ५ ऑगस्ट 2025 रोजी कार्यालयीन कामकाज करत असताना त्यांनी तिला लज्जास्पद वागणूक दिली. तसेच ३२८ लिटर डिझेलचे बनावट कोटेशन शासकीय निधीतून पास करण्यासाठी तिच्याकडे तगादा लावला, ऑनलाईन पावतीसाठी बंगल्यावर यावे लागेल असे सांगून त्रास दिला.
२४ सप्टेंबर रोजी कर्तव्यावर असताना दुपारी सांगळे यांनी “तुझा …… मीच जिरवणार आहे, तक्रार केलीस तरी तुला सोडणार नाही” अशा धमकीच्या शब्दांत बोलून मानसिक धक्का दिला. याआधीही तिने जिल्हाधिकारी, कारागृह उपमहानिरीक्षक तसेच महिला तक्रार निवारण समितीकडे तक्रार केली होती. मात्र, त्यानंतर सांगळे यांनी आणखी संतापून तिची बदनामी करण्यास सुरुवात केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
पीडित महिला कर्मचारी निवेदनात म्हटले आहे की  सहकारी महिला व पुरुष कर्मचारीदेखील नोकरीच्या भीतीने तिच्या बाजूने बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. परिणामी ती सतत मानसिक, भावनिक व शारीरिक छळ सहन करत असून तिच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
या प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे ऐरणीवर आला आहे. पीडित महिला कर्मचारी यांनी पोलीस अधीक्षकांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीवर कायदेशीर कारवाई करावी व मला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन कठोर पावले उचलावीत, अशी मागणी देखील केली आहे.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  dharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsosmanabadक्राईमगृहमंत्री देवेंद्र फडणीस महाराष्ट्र राज्यजिल्हा कारागृहधाराशिवधाराशिव जिल्हा न्यायालयपोलीस अधीक्षकमानसिक छळमानसिक तणावराज्य महिला आयोग रूपाली चाकणकर
Previous Post

पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीला धावली मातोश्री.!

Next Post

सत्ताधाऱ्यांचा गर्व जनतेसमोर चालत नाही शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घ्यावाच लागेल – आ. कैलास पाटील

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post

सत्ताधाऱ्यांचा गर्व जनतेसमोर चालत नाही शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घ्यावाच लागेल – आ. कैलास पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!