• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

ढोकीत महसूलमंत्री बावनकुळे यांची भव्य सभा; महायुती उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 3, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

ढोकीत महसूलमंत्री बावनकुळे यांची भव्य सभा; महायुती उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद

लोककल्याणकारी योजनांचा आढावा घेत मतदारांना महायुतीला पाठिंबा देण्याचे आवाहन

लोकमदत न्यूज

धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ढोकी येथे महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य जाहीर सभा घेतली. या सभेला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी मंत्री बावनकुळे यांनी महायुती सरकारने राज्यात राबवलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देत मुख्यमंत्री सौरवहिनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे सांगितले. तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली ‘लाडकी बहिण’ योजना ही महायुती सरकारची सामाजिक बांधिलकी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वांगीण विकास वेगाने सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. ढोकी येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कबाल्याच्या नोंदीचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिल्याने येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या सभेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महायुती सरकारचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना साथ देत असल्याचे सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर तेर गावच्या कन्या श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारून जनसेवेचे व्रत पुढे चालू ठेवले असल्याचे गौरवोद्गार काढले. अशा कठीण परिस्थितीत त्यांची धैर्यवान भूमिका सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच राज्य व केंद्र सरकारच्या योजनांचा पुरेपूर लाभ मिळवण्यासाठी येत्या ७ तारखेला ढोकी जिल्हा परिषद गटातील महायुतीचे उमेदवार संजू पवार, ढोकी गणाचे उमेदवार निहाल काझी आणि गोवर्धनवाडी गणाचे उमेदवार विलास रसाळ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.
या सभेला भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, अनिल काळे, गफ्फार काझी, अनंतराव देशमुख, संग्राम देशमुख, झुंबर बोडके, अनिल भुतेकर, जीवन देशमुख, सिराज मुल्ला, प्रमोद देशमुख, पांडुरंग वाकुरे, गुणवंत सुतार, दगडू धावारे, विकास देशपांडे, सतीश वाकुरे, राजपाल देशमुख, अंकुश जाधव, रशीद कुरेशी यांच्यासह ढोकी गटातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत जवळा जि.प. गट प्रचार सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

धाराशिव शहरातील ३२ हजाराचा गुटखा केला जप्त धाराशिव शहर पोलिस ठाण्याची गुटखाबंदी मोहीम जोरात 

Related Posts

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
राजकारण

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
Next Post

धाराशिव शहरातील ३२ हजाराचा गुटखा केला जप्त धाराशिव शहर पोलिस ठाण्याची गुटखाबंदी मोहीम जोरात 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!