• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

तुळजाई कला केंद्रामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार ! केंद्र तात्काळ बंद करण्याची रिपाइंची मागणी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 20, 2025
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) – हल्ली महिला व मुलींवर अत्याचार करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यावर कारवाई देखील होते, मात्र यावर पळवाट काढित वाशी तालुक्यातील पारगाव टोल नाक्याजवळील तुळजाई कला केंद्रामध्ये चक्क १४ ते १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलींचा सर्रास वापर करून त्यांच्यावर रात्रंदिवस लैंगिक अत्याचार केला जात आहे. त्यामुळे त्या मुलींची सुटका करण्यासह ते कला केंद्र तात्काळ बंद करण्यात यावे. अन्यथा दि.२५ ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) युवक आघाडीच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे दि.२० ऑगस्ट रोजी दिला आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील बीड व धाराशिव जिल्ह्याच्या बॉर्डरवर मात्र धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीत पारगाव टोलनाक्याजवळील तुळजाई कला केंद्र आहे. या केंद्रात १४ ते १६ वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुली असून त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात येत आहे. तसेच त्या कला केंद्रावर बीड जिल्ह्यातून बरेच युवक वाम मार्गाला लावण्याचे काम केले जात आहे. त्या कला केंद्रामध्ये वर्चस्वावरून सतत भांडणे होत असून ती भांडणे आवाक्याच्या बाहेर जातात. त्या भांडणामध्ये धारदार शस्त्रे, बंदूक व इतर हत्यारांचा सर्रास वापर केला जात असून ही अत्यंत गंभीर बाब आहे. विशेष म्हणजे या कला केंद्राचे मालक व संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलिसांची मिलीभगत आहे. तसेच या केंद्रावर डान्स पार्टी, मद्य विक्री असले कार्यक्रम चालत असल्यामुळे स्थानिक महिला व शालेय विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होत आहे. त्या केंद्रावर दररोज कोणल्याही कारणावरून गोळीबार, धारदार शस्त्र चालवणे असे प्रकार घडत आहेत. तर बीडमधील काही युवकांना या कला केंद्रावर बेदम मारहाण करण्यात आली. तसेच अनेकजणांचा या कलाकेंद्रामुळे अपघातात मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे त्या मुलींची तात्काळ सुटका करण्यासह ते कला केंद्र बंद करण्यात यावे. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. यावर रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष महेश आठवले, ॲड धम्मानंद वाघमारे, भूषण कांडेकर, राहुल कोकाटे, संतोष दळवी, अनिकेत कांबळे, अनिकेत आरुण, विशाल शिरसाट, अमोल राठोड, वैष्णव बेंद्रे व जयदीप काशीद यांच्या सह्या आहेत.

Previous Post

धाराशिव शहरातील गणेश विसर्जन मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

Next Post

पती-पत्नीची धारदार शस्त्रांनी क्रूरपणे हत्या करणाऱ्यासह सहभागी आरोपींना फाशी द्या ..

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post

पती-पत्नीची धारदार शस्त्रांनी क्रूरपणे हत्या करणाऱ्यासह सहभागी आरोपींना फाशी द्या ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!