• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

पो.नि दराडे यांनी धाराशिव शहरात विस्कळीत झालेली शांतता व सुव्यवस्था सहा महिन्यांत केली पुनर्स्थापित !

wp@dktechs.in by wp@dktechs.in
December 22, 2025
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

पो.नि दराडे यांनी धाराशिव शहरात विस्कळीत झालेली शांतता व सुव्यवस्था सहा महिन्यांत केली पुनर्स्थापित !

धाराशिव दि.२२ (प्रतिनिधी) – धाराशिव हे जिल्ह्याचे मुख्यालय असून या शहरात चोरी, मारामारी व अवैध धंदे वाढल्यामुळे गल्लोगल्ली कायदा व सुव्यवस्था पूर्णतः मोडकळीस आली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत व भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र धाराशिव शहर पोलीस ठाण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांनी स्वीकारताच शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन संपूर्ण शहरातील गल्ल्यांची पाहणी केली. बेशिस्त बनलेल्या शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी व सर्वांमध्ये पोलीस व पोलिस खात्याचा विश्वास दृढ होण्यासाठी दराडे यांनी योग्य पावले उचलली. त्यांनी अवघ्या सहा महिन्यांत शहरात शांतता प्रस्थापित करण्याचे नियोजनबद्ध काम करीत खाकी वर्दीत दडलेली माणुसकी व कायद्याचा धाक काय असतो ? हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यामुळे शहरात शांततेचे वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे.

धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार दराडे यांनी सहा महिन्यांपूर्वी पदभार घेतला त्याचवेळी कायदा व सुव्यवस्था राखत लागलीच गणपती उत्सव, नवरात्रोत्सव, अण्णाभाऊ साठे जयंती, ईद-ए-मिलाद आणि नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकी सुरळीतपणे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू न देता यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. वरील उत्सव व निवडणूक मिरवणुका, उत्सव शांततेत पार पाडण्यात पोलीस प्रशासन यशस्वी ठरले आहे.
पोलीस अधीक्षक रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफाकत आमना व उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात वेळोवेळी शांतता समितीच्या बैठका घेतल्या गेल्या. या बैठकींच्या माध्यमातून विविध समाजघटकांशी थेट संवाद साधत गैरसमज दूर करण्यात पोलीस अधिकाऱ्यांना यश आले. विशेष म्हणजे नागरिकांशी समन्वय साधण्यावर भर देत पोलिसांप्रती असलेली प्रतिमा सुधारण्याचे महत्त्वाचे काम झाले आहे. तसेच सात वर्षांपासून प्रलंबित असलेले मुद्देमाल प्रकरणे निकाली काढत प्रशासनिक कार्यक्षमतेचा आदर्श निर्माण केला आहे. तसेच शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करून संवेदनशील ठिकाणी सतत लक्ष ठेवण्यात आले. त्यामुळे संभाव्य धोके व उद्भवणाऱ्या आपत्तीजनक परिस्थितीवर वेळीच उपाय करण्यासह नियंत्रण मिळवणे देखील सहज शक्य झाले आहे. तर नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवरही पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांनी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवत विजयी मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी विशेष खबरदारी घेतली. कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू न देता शहरातील वातावरण सौहार्दपूर्ण राखण्यात पोलीस प्रशासन यशस्वी ठरले.

धाराशिव शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत करीत कायदा व सुव्यवस्था रुळावर आली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यात पोलिसांच्या भूमिकेबाबत सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे शांतता, संवाद आणि शिस्त या त्रिसूत्रीवर आधारित पोलिसिंगमुळे शहरात सुरक्षिततेचा विश्वास अधिक दृढ झाला असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे घवघवीत यश..आठ नगरसेवक विजयी, नगराध्यक्ष पदाला थोडक्यात हुलकावणी
जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी मानले मतदार व कार्यकर्त्यांचे आभार

Next Post

पो.नि दराडे यांनी धाराशिव शहरात विस्कळीत झालेली शांतता व सुव्यवस्था सहा महिन्यांत केली पुनर्स्थापित !

Related Posts

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;
क्राईम

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ
क्राईम

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
क्राईम

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;
क्राईम

मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;

August 25, 2026
चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

August 25, 2026
गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे
क्राईम

गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे

August 24, 2026
Next Post

पो.नि दराडे यांनी धाराशिव शहरात विस्कळीत झालेली शांतता व सुव्यवस्था सहा महिन्यांत केली पुनर्स्थापित !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!