• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

डी जे चालकांना ध्वनी प्रदूषणाविरोधात मोठा दणका!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 5, 2026
in क्राईम
0
डी जे चालकांना ध्वनी प्रदूषणाविरोधात मोठा दणका!
0
SHARES
66
VIEWS

धाराशिव पोलिस – ध्वनी प्रदूषणाविरोधात मोठा दणका! अण्णाभाऊ साठे जयंतीत नियमभंग करणाऱ्या डीजेवर कारवाई लाखो रुपयांचे साहित्य व वाहने जप्त

धाराशिव लोकविचार

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरात ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करून डीजे व डॉल्बीचा वापर करणाऱ्यांविरोधात धाराशिव शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत अनेक डीजे संच, वाहने आणि लाखो रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.

या कारवाईमुळे ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला असून, भविष्यात अशा प्रकारांना कोणतीही मुभा दिली जाणार नसल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

कारवाईदरम्यान वास्तव ग्रुपचे आयोजक बापू धर्मा चव्हाण, लहुजी शक्ती सेनेचे आयोजक लखन उमेश क्षीरसागर (एम डी, ग्रुप), रॉबिन बगाडे मित्रपरिवाराचे आयोजक पोपट पुंडलिक बगाडे, क्रांतिवीर फकीरा सामाजिक संघटनेचे आयोजक सम्यक कुंदन चिलवंत यांच्यासह संबंधित डीजे मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यामध्ये आजाद डीजे साऊंड सिस्टिमचे मालक प्रमोद शिवाजी काकडे (रा. तळेगाव, ता. मावळ, जि. पुणे), बकासुर डीजेचे मालक रविकांत उमाकांत तोरणे (रा. इंदापूर, जि. पुणे), एस.आर. डॉल्बीचे मालक शंकर गजानन पत्रवाळे (रा. रिसोड, जि. वाशिम) तसेच रुबाब डीजेचे मालक वैभव विक्रम जाधव (रा. घाट पिंपरी, ता. वाशी, जि. धाराशिव) यांच्यावरही नियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.संबंधित डीजे वाहने आणि ध्वनीक्षेपक साहित्य जप्त करण्यात आले असून त्याची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ होमकर, कासूळे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक अक्षय डिगोळे, पोलीस कर्मचारी तलवारे तसेच शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. पुढील कारवाई धाराशिव शहर पोलीस करत आहेत.

धाराशिव पोलिसांनी गेल्या वर्षभरात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या डीजे चालक व आयोजकांवर सातत्याने दंडात्मक आणि न्यायालयीन कारवाई केली आहे. अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाने संबंधितांवर लाखो रुपयांचा दंडही ठोठावला आहे. तरीदेखील काही आयोजक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे यावेळी पोलिसांनी अधिक कठोर भूमिका घेत थेट डीजे व वाहने जप्त करण्याची कारवाई केली.

धाराशिव पोलिसांकडून शांतता कमिटीची बैठक घेऊन वारंवार नागरिकांना, मंडळांना व आयोजकांना पारंपरिक वाद्यांचा वापर करून जयंती, उत्सव आणि मिरवणुका साजऱ्या करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ध्वनी प्रदूषणामुळे नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या तसेच शासनाच्या नियमांचे पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

धाराशिव पोलिसांचे आवाहन :

यापुढील काळात डॉल्बी व नियमबाह्य डीजेचा वापर टाळावा. पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून जयंती, धार्मिक व सामाजिक उत्सव साजरे करून सामाजिक सलोखा आणि कायद्याचा सन्मान राखावा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashiv collectordharashiv osmanabadआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव पोलिस
Previous Post

जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची स्थापना

Next Post

‘आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’

Related Posts

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला
क्राईम

मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

September 24, 2026
बसस्थानकात पोलिसाच्याच खिशावर डल्ला;
क्राईम

बसस्थानकात पोलिसाच्याच खिशावर डल्ला;

September 24, 2026
Next Post
‘आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’

'आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०'

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!