• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 5, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव शहरातून बाहेर पडण्याचा प्रमुख मार्ग असलेल्या सांजा रोडवरील भीषण अवस्थेबाबत लोकमदत न्यूजमध्ये १ मार्च २०२६ रोजी बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन आणि संबंधित ठेकेदार खडबडून जागे झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक दिवसांपासून खड्डे, धूळ आणि वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या या रस्त्याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच ठेकेदाराच्या वतीने तातडीने काही हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
सध्या सांजा रोडवर उडणारी धूळ कमी करण्यासाठी दररोज दोन वेळा टँकरद्वारे पाणी मारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र नागरिकांच्या मते हा उपाय केवळ तात्पुरती मलमपट्टी असून प्रत्यक्ष रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्याची गरज आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक या अवघ्या दीड किलोमीटरच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना अर्धा ते पाऊण तास वेळ लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधणारी बातमी लोकमदत न्यूजमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासन आणि ठेकेदाराने तातडीने धूळ नियंत्रणासाठी पाणी मारण्याची प्रक्रिया सुरू केली.
मात्र स्थानिक नागरिकांनी या उपायावर नाराजी व्यक्त केली आहे. “धुळीवर पाणी मारून प्रश्न सुटणार नाही. रस्त्याचे काम मंजूर असूनही अनेक वर्षे प्रलंबित आहे. तात्पुरत्या उपायांऐवजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या मार्गावरून सांजा, सारोळा, सकणेवाडी, चिखली, राजुरी, बोरगाव, समुद्रवाणी, सांगवी, कामेगाव, पाडोळी, औसा, शिवली, वाघोली, काजळा, मेंढा, घुगी, नितळी आदी गावांतील हजारो नागरिक दररोज प्रवास करतात. त्यामुळे या रस्त्याची अवस्था सुधारण्याची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे.
दरम्यान, लोकमदत न्यूजच्या दणक्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या असल्या तरी नागरिकांचा प्रश्न “केवळ धूळ दाबण्यासाठी पाणी मारणे हा उपाय आहे का? की प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार?”
आता प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार खरोखरच या गंभीर प्रश्नावर ठोस पावले उचलणार की पुन्हा केवळ तात्पुरत्या उपायांवरच समाधान मानले जाणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #धाराशिव #उस्मानाबाद #क्रांतीदिन #शाळा #झेंडा_वंदन #माध्यमिक
Previous Post

श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास भव्य-दिव्य व दर्जेदारच ५८२ कोटींच्या आराखड्याचा मंत्रालयात आढावा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

Next Post

‘सर्व धर्म समभाव’चा संदेश देत एस एम ग्रुप साजरी करणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

Next Post

‘सर्व धर्म समभाव’चा संदेश देत एस एम ग्रुप साजरी करणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार! मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही
  • येडशी–टेंभुर्णी चौपदरीकरणाला तीन महिन्यांत मंजुरी त्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही
  • धक्कादायक! पत्नीने प्रियकराच्या मदतीने घडवून आणला नवऱ्याचा खून! ग्रामीण पोलिसांचा अवघ्या काही तासांत उलगडा
  • कळंबमध्ये अनैतिक देहव्यवसायावर पोलिसांचा छापा प्रभात लॉजमधून दोन महिलांची सुटका, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आवाहनाला प्रतिसाद धाराशिव बसस्थानकात विभाग नियंत्रक पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण

Recent Comments

  1. Austen Web on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Randy WebDev on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.