• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत मूल्यमापन समितीच्यावतीने धाराशिव बस स्थानकाची पाहणी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 29, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत मूल्यमापन समितीच्यावतीने धाराशिव बस स्थानकाची पाहणी

अधिकाऱ्यांनी कामांचे केले कौतुक !

धाराशिव दि.२९ (प्रतिनिधी) – स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर व स्थानक अभियानांतर्गत मूल्यमापन समितीने धाराशिव बस स्थानकाला दि.२७ नोव्हेंबर रोजी भेट दिली. यावेळी मुंबई प्रदेशच्या प्रादेशिक व्यवस्थापक चेतना खिरवाडकर, मुंबई प्रदेशचे प्रादेशिक अभियंता विवेक लाेंढे, धाराशिवचे विभाग नियंत्रक अजय पाटील, प्रभारी विभागीय वाहतूक अधिकारी संतोष कोष्टी, धाराशिव विभागीय अभियंता राहुल पवार,धाराशिवचे आगार व्यवस्थापक बालाजी भांगे, धाराशिव आगाराचे वाहतूक निरीक्षक काझी याहीया अहेमद सुहेल अहेमद, सहा. वाहतूक अधिकारी मु.रा. कोमटवार, प्रवाशी मित्र राठीं आदींसह एसटी विभागाचे अधिकारी व कर्मचारी होते. यावेळी मूल्यमापन समितीने धाराशिव बस स्थानकातील स्वच्छता, सुंदरीकरण, प्रवाशांसाठी असलेले सुलभ शौचालय, स्तनदा मातांच्या हिरकणी कक्ष, पिण्याचे पाणी, प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या इतर सोयी सुविधांची पाहणी करून मूल्यमापन केले. तसेच त्यांनी प्रवाशांशी संवाद साधून बसेस वेळेवर सुटतात का ? विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांशी संवाद साधला. स्व.बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर व बस स्थानक अभियानांतर्गत मूल्यमापन समितीकडून तपासणीचा तिसरा टप्पा सुरु आहे. त्यामुळे दि.२७ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर बस स्थानकांची पाहणी करुन ४ वाजण्याच्या दरम्यान समिती धाराशिव बस स्थानकात पोहचली. एसटीच्या राज्यभरातील सर्व बस स्थानकावर हिंदु हृदयसम्राट स्व बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ३ कोटी रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. राज्यात “अ’ वर्ग दर्जा प्राप्त पहिला क्रमांक येणाऱ्या बस स्थानकास १ कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. यानिमित्त बस स्थानकात शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था व एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छ व सुंदर बसस्थानक तसेच निर्जंतुक, टापटीप प्रसाधनगृहे कायमस्वरुपी उपलब्ध करून देणे हे एस. टी.चे प्राधान्य असल्याची माहिती खिरवाडकर यांनी सांगितली. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर व बस स्थानक’ अभियान अंतर्गत मूल्यमापन समिती प्रमुख तथा मुंबई प्रदेशच्या प्रादेशिक व्यवस्थापक खिरवाडकर, मुंबई प्रदेशचे प्रादेशिक अभियंता लाेंढे यांनी धाराशिव बस स्थानकातील झालेल्या बदलाचे कौतुक करुन लांब पल्याच्या मार्गावरील कामांच विशेष कौतुक केले.

बस स्थानकात खासगी वाहतूक वाहन आल्यास कारवाई – काझी याहीया आगार वाहतूक निरीक्षक

प्रवाशांची संख्या वाढलेली असल्यामुळे खाजगी वाहतूकदार त्यांच्या खाजगी वाहनाने संबंधित प्रवाशांना त्यांच्या गावी नेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी धाराशिव आगाराने पुणे, लातूर, सोलापूरसह विविध मार्गावर जादा बर्सेस सोडल्या आहेत. पुण्यासाठी २० जादा बस सोडल्या आहेत. तर सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांची एसटी बसलाच पसंती आहे. बस स्थानकात खासगी वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. जर खाजगी वाहनधारकांनी बस स्थानकात येऊन येथील प्रवाशांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर थेट कारवाई करणार असल्याचा इशारा धाराशिव आगाराचे वाहतूक निरीक्षक काझी याहीया यांनी दिला आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

धाराशिव बस स्थानकात लोकमदत न्यूजच्या बातम्यांचा तात्काळ परिणाम!

Next Post

सांजा रोड येथील रामेश्वर मोहिते खून प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

सांजा रोड येथील रामेश्वर मोहिते खून प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!