• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय, दडपशाही व खोट्या कारवाईच्या विरोधात पत्रकार एकवटले

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 25, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे पत्रकारांना धमकवणाऱ्यांवर कारवाईची मागणी

धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) – पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय, दडपशाही व खोट्या कारवाईच्या धमक्या दिल्या जात आहेत. तर तुळजापूर येथील ड्रग प्रकरण आदींसह विविध मुद्द्याबाबत पत्रकारांनी वास्तव मांडल्यामुळे पत्रकारांना टार्गेट करीत बघून घेईन, आमच्या कार्यकर्त्यांचा संयम सुटल्यानंतर पत्रकारांचे काय होईल ? यासह इतर प्रकारच्या धमक्या देण्याचे प्रकार हल्ली वाढलेले आहेत. त्यामुळे पत्रकारांना धमकावणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे पत्रकारांच्या शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे दि.२५ ऑगस्ट रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मागील अनेक वर्षांपासून समाजातील घडामोडी, जनहिताचे प्रश्न आणि शासनाच्या योजनांची माहिती प्रामाणिकपणे जनतेपर्यंत आम्ही पोहोचवत आहे.परंतु अलीकडील काळात आमच्यावर अन्याय, दडपशाही व खोट्या आरोपांचा प्रयत्न करण्यात येत आहे.

काही दिवसापूर्वी अवैध धंदे सरसकट का बंद केले जात नाहीत ? याबाबत दैनिक प्रजापत्रचे भूम तालुका प्रतिनिधी चंद्रमणी गायकवाड यांनी स्थानिक पोलिसांना प्रश्न विचारला त्यावेळी तुम्ही शासकीय कामात अडथळा निर्माण करता का ? असे म्हणत एनसी दाखल करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे त्यांना एफआयआर प्रत देण्यास नकार देण्यात आला. तसेच धाराशिव लाईव्हचे संपादक सुनील ढेपे यांनाही तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरक्षक मांजरे यांच्याकडून धमकावण्यात आले. तर तुळजापूर येथील आनंद कंदले यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट  पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच ढेपे यांना बघून घेऊ म्हणत पोलीस तक्रार करण्यात आली आहे.

पत्रकार यांच्यावर खोटे गुन्हे नोंद करणे, त्यांच्यावर हल्ला व जीवितास धोका निर्माण झाल्यास संबंधितांना जबाबदार धरावे. कारण आनंद कंदले यांनी पोलिस अधीक्षक यांच्या समोरच कार्यकर्त्याचा  प्रक्षोभ झाला असून अनुचित प्रकार होईल असे वक्तव्य केले होते. त्यामुळे अशा दबावात पत्रकार बातमीदारी कशी करणार ? असा प्रश्न पत्रकारापुढं पडला आहे.विशेष म्हणजे पत्रकारितेला लोकशाहीतील चौथा स्तंभ मानले जाते. सत्य वार्तांकन करणे हा पत्रकारांचा घटनात्मक अधिकार आहे. परंतू अशा प्रकारच्या अन्यायामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून लोकशाही धोक्यात येत आहे.

त्यामुळे पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय, धमक्या किंवा खोट्या गुन्ह्यांची तात्काळ चौकशी करावी.  दोषींवर कायदेशीर कारवाई करून पत्रकारांना न्याय द्यावा.
वार्तांकन करताना पत्रकारांच्या सुरक्षेची हमी द्यावी. तसेच  पत्रकार संरक्षण कायद्याची तात्काळ अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी आदी मागण्या केल्या आहेत.

यावेळी हुंकार बनसोडे, राजाभाऊ वैद्य, संतोष जाधव, बालाजी निरफळ, रहीम शेख, चंद्रसेन देशमुख, सयाजी शेळके, महेश पोतदार, शीला उंबरे, आकाश नरोटे, जुबेर शेख, किरण कांबळे, आतिक सय्यद, युसुफ मुल्ला, वैभव पारवे, सुभाष कदम, किशोर माळी, आयुब शेख, मुस्तफा पठाण, प्रमोद राऊत, कलीम शेख, पांडुरंग मते, मल्लिकार्जुन सोनवणे, अमजद सय्यद, गणेश जाधव, संतोष शेटे, कुंदन शिंदे, राकेश कुलकर्णी, विशाल जगदाळे, जब्बार शेख, कलीम सय्यद, सुरेश चव्हाण आदी पत्रकारांच्या सह्या आहेत.

Tags: cmoगृहमंत्रीजिल्हाधिकारी कार्यालयतक्रारनिवेदनपत्रकारपत्रकार हल्लापोलिस अधीक्षक
Previous Post

धाराशिव शहरात गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च

Next Post

लाकाळ राजकीय व सामाजिक जिल्हा स्तरीय पुरस्काराने सन्मानित

Related Posts

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र

आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

August 20, 2026
Next Post

लाकाळ राजकीय व सामाजिक जिल्हा स्तरीय पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!