• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

परिवहन मंत्री सरनाईक यांच्या होमपीच असलेल्या धाराशिवमध्येच दारुड्या चालक, वाहक यांची तपासणी करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष ?

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 15, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

परिवहन मंत्री सरनाईक यांच्या होमपीच असलेल्या धाराशिवमध्येच दारुड्या चालक, वाहक यांची तपासणी करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष ?

२५ जानेवारीचे आदेश असतानाही अंमलबजावणी नाही! अल्कोहोल टेस्ट मशिन धाराशिवमध्ये मशीन धूळखात पडून!

धाराशिव लोकमदत न्यूज

राज्य परिवहन महामंडळामध्ये कर्तव्यावर असताना मद्यपान (दारु पिणाऱ्या) करणाऱ्या चालक व कर्मचारी यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, असे सक्त आदेश राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेले आहेत. मात्र, होमपीच असलेल्या धाराशिव विभाग नियंत्रक यांच्याकडून आदेशाला केराची टोपली नव्हे तर चक्क ‘दारूच्या बाटलीत आदेश बंद करण्याचे’ काम केले जात असल्याचे धक्कादायक बाब समोर येत आहे. त्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अर्थात अल्कोटेस्ट मशिनव्दारे मद्य प्राशन तपासणी करण्यासाठी मशीन उपलब्ध आहेत. मात्र आगारप्रमुख पर्यायाने धाराशिव विभाग नियंत्रक टाळाटाळ का करीत आहेत ? असा संतप्त सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून संबंधित कर्तव्य चोर (आगार व्यवस्थापक) धिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ठिकाणी जर आदेशाची अंमलबजावणी होत नसेल तर तालुक्याच्या ठिकाणची काय अवस्था असेल ? याचा विचार न केलेला बरा.

राज्य परिवहन महामंडळातील चालक व वाहक हे कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्य प्राशन केलेले असतात. त्यामुळे अपघात होऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला होता. ते संभाव्य धोके टाळण्यासाठी आणि प्रवाशांना सुरक्षित आणि प्रवास आरामदायी सेवा मिळावी यासाठी परिवहन मंत्री सरनाईक यांनी त्यांची तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. बस स्थानकातून साधारणतः पहाटे चार वाजल्यापासून वाहतूक सुरू असते. दरम्यान मंत्री सरनाईक यांनी परळ आगारात सदिच्छा भेट दिली असता आगारातील विश्रामगृहात दारूच्या रिकाम्या बाटल्या व चालक घोरपडे मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे राज्यातील सर्व चालक व वाहक यांची मद्य प्राशन तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यासाठी प्रत्येक विभागात विशेषतः आगारात देखील खास पथक नेमून त्या पथकामार्फत तपासणी करणे बंधनकारक आहे. तसेच मद्य प्राशन करणाऱ्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यादृष्टीने प्रतिबंधक उपाय करण्याचे आदेश दिलेले आहेत. राज्यातील प्रत्येक आगारातील कामगिरीवर जाणाऱ्या सर्व चालकांची वाहन परिक्षक यांच्या मार्फत नियमितपणे दररोज अल्कोटेस्ट
मशिनव्दारे मद्यपान तपासणी करून व त्याच्या योग्य त्या नोंदी घेऊनच चालकास कर्तव्यावर पाठविणे आवश्यक आहे. आगारातील कामगिरीवर जाणाऱ्या सर्व वाहकांची ईटिआयएम मशिन व वे-बील देण्यापुर्वी संबंधित वाहतूक नियंत्रक यांच्या मार्फत नियमितपणे दररोज अल्कोटेस्ट मशिनव्दारे मद्यपान तपासणी करून व त्याच्या योग्य त्या नोंदी घेऊनच चालकास कर्तव्यावर पाठविणे बंधनकारक आहे. तर आगारातील कामगिरीवर जाणाऱ्या सर्व चालक व वाहकांची मद्यपान तपासणी केलेली आहे किंवा नाही ? याची तपासणी व खातरजमा सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक, सहाय्यक वाहतुक अधिक्षक, वाहतूक निरीक्षक, सहा. वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रक, पाळी प्रमुख यांनी करणे आवश्यक आहे. तसेच आगार व्यवस्थापक यांनी या सर्व बाबीवर नियमितपणे नियंत्रण ठेऊन प्रभावीपणे अंमलबजावणी करुन घेणे आवश्यक आहे. तर बस मार्गावर असताना चालकानेच नियंत्रण कक्षामध्ये लॉगशिटची नोंद करण्यासाठी जाऊन नोंद करणे बंधनकारक करावे व चालक नोंद करण्यासाठी आल्यानंतर कामगिरीवरील वाहतूक नियंत्रक यांच्यामार्फत सदर चालकाची नियमितपणे दररोज अल्कोटेस्ट मशिनव्दारे मद्यपान तपासणी करून व त्याच्या योग्य त्या नोंदी घेऊनच चालकास पुढील मार्गावर पाठविणे आवश्यक आहे. या तपासणी नियमितपणे होत आहे किंवा नाही, याबाबत स्थानक प्रमुख यांनी खात्री करावी. बसस्थानक व आगारामध्ये असलेल्या चालक, वाहक व यांत्रिक विश्रांती गृहातील कर्मचारी यांची नियमितपणे अल्कोटेस्ट मशिन व्दारे तपासणी करुन योग्य त्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे. विभागातील पालक अधिकारी यांनी वरील नमुद केल्याप्रमाणे अंबलबजावणी होत आहे किंवा नाही, याची आगार किंवा बस स्थानक भेटी दरम्यान नियमितपणे तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच या बाबतीत विभागात वेळोवेळी गोपनीय पध्दतीने विशेष तपासणी मोहिम राबवून अल्कोटेस्ट मशिनव्दारे विभागातील सर्व अधिकारी, मार्ग तपासणी पथके, वाहतूक निरीक्षक, (प्रशिक्षण) व सुरक्षा व दक्षता विभागातील पर्यवेक्षक यांच्यामार्फत तपासणी कार्यक्रम राबविण्यात यावा. तर चालक, वाहक व इतर सर्व कर्मचारी यांचे प्रशिक्षण दरम्यान व आगारात वेळोवेळी प्रजापती ब्रम्हकुमारी यासारख्या सामाजिक संस्थेमार्फत मद्यपान केल्याचे दुष्परिणाम याबाबत प्रबोधन व समुपदेशन करणे आवश्यक आहे. याशिवाय
आगारामध्ये विशेष करुन ६ महिन्यातून एकदा मद्यपान जनजागृती सप्ताह आयोजित करुन चालक, वाहकांना व इतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनपर चर्चासत्रे, भाषणे व प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील मुख्यालयाच्या चालक, वाहक विश्रांतीगृहात तसेच ज्या आगाराच्या बस स्थानकाच्या चालक, वाहक विश्रांतीगृहात जास्त प्रमाणात चालक व वाहक रात्रवस्तीला असतात. अशा चालक किंवा वाहक विश्रांतीगृहात कर्मचारी खाते परिपत्रक क्र. ०४/२०२०, दि.२३/०१/२०२० मध्ये दिलेल्या सुचनेनुसार अतिथ्यालय परिचर नेमूण, त्यांच्यामार्फत विश्रांतीगृहातील चालक व वाहक यांच्या सर्व प्रकारच्या नोंदी ठेवणे तसेच चालक, वाहक यांच्या पाण्याची व्यवस्था, लाईट पंखे इत्यादी बाबीची देखरेखेची जबाबदारी देणे योग्य राहील. त्यामुळे वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून त्याची अंमलबजावणी करावी असे आदेश आहेत. मात्र, धाराशिव व्यवस्थापक याबाबत उदासीन का आहेत ? असा प्रश्न प्रवासी वर्गातून विचारला जात आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

लवकरच शहरवासियांना उजनी सोबत तेरणा धरणाचे पाणी मिळणार – सभापती लोंढे

Next Post

मार्गदर्शक माजीमंत्री विकासरत्न आ.प्रा.डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

मार्गदर्शक माजीमंत्री विकासरत्न आ.प्रा.डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!