• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

रमजानच्या पार्श्वभूमीवर प्रभाग १७ मध्ये तात्काळ उपाययोजना सुरू करा नगरसेवक इस्माईल शेख व एजाज काझी यांची नगर परिषद प्रशासनाकडे विनंती 

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 20, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

रमजानच्या पार्श्वभूमीवर प्रभाग १७ मध्ये तात्काळ उपाययोजना सुरू करा नगरसेवक इस्माईल शेख व एजाज काझी यांची नगर परिषद प्रशासनाकडे विनंती 

धाराशिव | लोकमदत न्यूज 

मुस्लिम समाज बांधवांच नुकत्याच सुरू झालेल्या पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव नगर परिषद प्रभाग क्रमांक १७ मध्ये नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष दिले आहे. मुस्लिम बहुल असलेल्या या प्रभागात पिण्याच्या पाण्याची टंचाई, बंद असलेल्या स्ट्रीटलाईट्स तसेच तुंबलेल्या नाल्यांमुळे नागरिकांना विशेषतः नमाज पठणासाठी मस्जिदमध्ये ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता.

ही बाब लक्षात येताच या प्रभागातील लोकप्रतिनिधी इस्माईल बाबा शेख व एजाज काझी यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधत बंद पडलेली स्ट्रीटलाईट व्यवस्था सुरू करून घेतली. तसेच काही भागात  मस्जिद परिसरातील बंद लाईट्सही त्वरित सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव पहाटे सहरी करून नमाज पठण व धार्मिक वाचन करत असतात. मात्र पाण्याचे नियोजन नसल्याने रोजेदारांना त्रास सहन करावा लागत होता.

या पार्श्वभूमीवर दोन्ही लोकप्रतिनिधींनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रभाग क्रमांक १७ मध्ये एक महिन्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करावे, ठराविक दिवस व वेळ निश्चित करून नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. रोजेदार नागरिकांची हेळसांड होऊ नये, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलता दाखवावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

याशिवाय प्रभागात अनेक ठिकाणी नाल्या तुंबून सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने मस्जिदकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबतही इस्माईल शेख व एजाज काझी यांनी तात्काळ सर्व नाल्यांची स्वच्छता, रस्त्यांची साफसफाई व सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. संबंधित कामे तातडीने मार्गी लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रभागातील नागरिकांनी आपली समस्या नगरसेवकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी त्वरित दखल घेत कार्यवाही सुरू केल्यामुळे नागरिकांनी इस्माईल शेख व एजाज काझी यांचे आभार मानले. रमजानसारख्या पवित्र महिन्यात मूलभूत सुविधा सुरळीत राहाव्यात, यासाठी लोकप्रतिनिधींची घेतलेली पुढाकार कौतुकास्पद असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

दरम्यान, नगर परिषद प्रशासनानेही या मागण्यांकडे सहानुभूतीपूर्वक पाहून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला आ.सावंतांच्या हालचालींनी राजकीय पट तापला

Next Post

अजितदादांच्या सासरवाडीत नगर परिषदेत पडला विसर !श्रद्धांजली अर्पण करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये का नाही ?

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post

अजितदादांच्या सासरवाडीत नगर परिषदेत पडला विसर !श्रद्धांजली अर्पण करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये का नाही ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!