• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला आ.सावंतांच्या हालचालींनी राजकीय पट तापला

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 20, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला आ.सावंतांच्या हालचालींनी राजकीय पट तापला

सासरवाडीतून अजितदादांना ‘आदरांजली’? शिंदेसेनेकडून अध्यक्षपदाची ऑफर? धाराशिव मध्ये नवे समीकरण!

धाराशिव / लोकमदत न्यूज

धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा तिढा कायम असतानाच पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. ५५ सदस्यीय सभागृहात सर्वाधिक १९ जागांसह भाजप पहिल्या क्रमांकावर असला, तरी स्पष्ट बहुमतापासून दूर आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांची एकत्रित ताकद, राष्ट्रवादी अजित पवार गटाची निर्णायक भूमिका आणि अपक्षांचे महत्त्व यामुळे अध्यक्षपदाची शर्यत चुरशीची बनली आहे.

भाजपकडून अध्यक्षपदावर आपलाच दावा कायम ठेवत तेर गटातून विजयी झालेल्या अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव पुढे केल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर विविध सदस्यांसोबतचे फोटो प्रसारित करत ‘धक्का तंत्र’ वापरले जात असल्याचे विरोधकांचे आरोप आहेत. सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेचा हक्क भाजपचाच, असा सूर त्यांच्या नेत्यांकडून उमटतो आहे.

दुसरीकडे, शिंदे गटानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी मंत्री आमदार प्रा. तानाजीराव सावंत यांनी मुंबईत नेतृत्वाशी सलग चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. जिल्हा परिषदेतील सत्तागणिते, संभाव्य आघाड्या आणि भाजपच्या हालचालींबाबत त्यांनी सविस्तर आढावा दिल्याचे सांगितले जात आहे. सत्ता स्थापनेची सूत्रे सावंत यांच्या हाती सोपवली गेल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या सगळ्या समीकरणांत राष्ट्रवादी अजित पवार गट ‘किंगमेकर’ ठरू शकतो. सहा सदस्यांच्या बळावर अध्यक्षपदाची ऑफर या गटाला देण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. धाराशिव हा अजित पवार यांचा सासरवाडीचा जिल्हा असल्याने ‘सासरवाडीतून आदरांजली’ या राजकीय प्रतिमेलाही उधाण आले आहे. अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेल्यास तो निर्णय केवळ सत्तासमीकरण न राहता प्रतीकात्मक संदेश ठरेल, असे मत व्यक्त केले जाते.

दरम्यान, संभाव्य फुट टाळण्यासाठी प्रमुख पक्षांनी सदस्यांना ‘सेफ झोन’मध्ये ठेवण्याची रणनीती आखल्याचे दिसते. सहली, बैठकांची मालिका आणि बंद दाराआडच्या चर्चा यामुळे वातावरण अधिकच तापले आहे. अंतिम क्षणी कोण बाजी मारणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अध्यक्षपदाची निवडणूक जवळ येत असताना राजकीय पटावर अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत. सावंतांच्या पुढील हालचाली, राष्ट्रवादीची भूमिका आणि अपक्षांचे गणित यावरच धाराशिव जिल्हा परिषदेतील सत्तेचे चित्र अवलंबून राहणार, हे मात्र निश्चित. पुढील काही दिवसांत जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरण आकार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाचे औचित्य साधत अद्ययावत फिलगुडी शॉपचे लोकार्पण

Next Post

रमजानच्या पार्श्वभूमीवर प्रभाग १७ मध्ये तात्काळ उपाययोजना सुरू करा नगरसेवक इस्माईल शेख व एजाज काझी यांची नगर परिषद प्रशासनाकडे विनंती 

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post

रमजानच्या पार्श्वभूमीवर प्रभाग १७ मध्ये तात्काळ उपाययोजना सुरू करा नगरसेवक इस्माईल शेख व एजाज काझी यांची नगर परिषद प्रशासनाकडे विनंती 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!