• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

तामलवाडी पोलिसावर तत्काळ निलंबनाची कारवाई मात्र धाराशिव ‘झिरो उर्फ तोतया व्यवहार’ प्रकरणी कोणाचा आशीर्वाद ?

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 27, 2025
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

तामलवाडी पोलिसावर तत्काळ निलंबनाची कारवाई

धाराशिव ‘झिरो उर्फ तोतया व्यवहार’ प्रकरणी कोणाचा आशीर्वाद ?

जिल्हा दौऱ्यावर असलेले विशेष पोलीस महानिरीक्षक जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलिसा अधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काही कानमंत्र देणार का ?

धाराशिव, दि. २६ (अमजद सय्यद): जिल्हा पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या आदेशानुसार तामलवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अल्ताफ मकबुल गोलंदाज (बकल नं. 1413) यांना दि. 19 नोव्हेंबर 2025 रोजी कर्तव्यावर असताना जाणूनबुजून केलेल्या कसुरीचे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तत्काळ निलंबित करण्यात आले. पोलीस दलात जबाबदारी व शिस्तीला प्राधान्य देत निष्काळजीपणास सहनशीलता नाही, असे एसपी खोखर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. मात्र, निलंबनाच्या या जलद कारवाईच्या पार्श्वभूमीवर धाराशिव शहरातील “झिरो /तोतया पोलिसांच्या मदतीने झालेल्या केळीच्या गाड्यावरील  कथित पिशवी व्यवहार” प्रकरणावर कारवाई होणार का ? असा प्रश्न शहरवासियांकडून उपस्थित केला जात आहे. आठवडी बाजाराजवळ अवैध दारू वाहतूक प्रकरणात कथित कॅरीबॅगखाली ठेवून झालेल्या पैशांच्या देवाणघेवाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, त्या संदर्भात रिक्षाचालक थेट एसपीकडे तक्रार दाखल करणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे.
या झिरो /तोतया आणि काही “घुग”ऱ्या खाऊन “बेळ”गाम झालेल्या पोलिसांना काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच पाठबळ असल्याच्या चर्चा आता शहरभर सुरू झाल्या आहेत. त्यातच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मागील दहा ते पंधरा दिवसांपूर्वी अशाच स्वरूपाच्या तक्रारी अर्ज दाखल असूनही कारवाई गुलदस्त्यात आहे, तर अवैध वाहतूक, तोडपाणी, रस्त्यावर वाहन अडवून पैसे गोळा करणे यांसारख्या आरोपांनी शहरातील नागरिक आणि प्रामाणिक पोलिसांमध्ये संताप उसळला आहे. तामलवाडी प्रकरणात तातडीची कारवाई झाली, तर धाराशिव शहरातले काहीजण मात्र “सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडींसारखे संरक्षित ?” असा प्रश्न निर्माण झाला असून यामुळे विविध प्रकारच्या चर्चा चवीने रंगू लागले आहेत.
आता सर्वांचे लक्ष एकाच दिशेकडे तामलवाडीसारखी कडक कारवाई धाराशिव झिरो /तोतया व्यवहार प्रकरणातही होणार की पुन्हा फक्त (गोलामल) कागदी घोडे नाचून ‘संरक्षण’च दिले जाणार ?
जनता व पोलीस दलातील प्रामाणिक कर्मचारी उत्तराची वाट पाहत आहेत !
खरंच सदरील प्रकरण संपूर्ण पारदर्शक करून पोलिसांची प्रतिमा मलिन होऊ नये असे वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी संबंधित “त्या” झिरो/ तोतया पोलिसाचे छायाचित्र प्रसिद्धी करून या महाशयाने आतापर्यंत कितीजणांना पोलीस असल्याचे भासवून फसवणूक केली आहे ? त्यांनी रीतसर तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे करावी, त्यांची नावे चौकशी होईपर्यंत गोपनीय ठेवले जातील, असे आश्वासन वजा आवाहन करताच असंख्य फसवणूक झालेले सर्वसामान्य नागरिक यांच्यासह छोटे-मोठे व्यापारी व वाहन चालक पुढे येऊन तक्रार करतील. त्यानंतर या तोतया अर्थात झिरो उर्फ हिरो बनलेल्या त्रिकुटाचे अनेक कारणाने समोर येण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील फसवा फसवीचे मोठे रॅकेट उघड होणार ?
‘त्या’ झिरो पोलिसाची ओळख परेड होणार का ?

जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी मी पोलीस आहे, पुढे अपघात झाला आहे किंवा लुटमार करणारी टोळी आली आहे. तुमच्या जवळचे दागिने व पैसे काढून आमच्याजवळ द्या, आम्ही सुरक्षित ठेवतो अशी बतावणी करणारे तोतया पोलीसांचे रॅकेट कार्यरत आहे. त्यांचे हे रॅकेट मोठे असून त्यांना पोलिसांचा वरदहस्त आहे का?. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या ज्या नागरिकांना मी पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्याकडून सोने, चांदी आदींचे दागदागिने व पैसा आपल्याजवळ ठेवून घेऊन त्यांनी आजपर्यंत कोट्यवधी रुपयांची लूटमार केली आहे. मात्र, आजपर्यंत संबंधित तोतया पोलिसांना पकडण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा पोलीस प्रशासनाला देखील यश आलेले नाही. त्यामुळे त्या टोळीच्या मागे कोणत्या पोलिसांचे आशीर्वाद आहेत ? ती टोळी आजपर्यंत का जेरबंद केली गेली नाही ? चोरी गेलेला माल कुणाच्या घशात घातला ? याची चौकशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी का केली नाही ? त्यामुळे ज्यांची अशा पद्धतीने फसवणूक करून लुबाडणूक केली आहे, अशा सर्व संबंधित पीडित नागरिकांना बोलावून त्यांच्यासमोर या झिरो/ तोतया पोलिसाची ‘ओळख परेड’ करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण ज्यांची फसवणूक झाली ते नागरिक त्या झिरो/ तोतया पोलिसास काही क्षणात ओळखून दूध का दूध पानी का पानी केल्याशिवाय राहणार नाही, यात कुठलीही शंका नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक खोखर यांना खरोखरच अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांचा छडा लावून त्यास गजाआड करायचे असेल तर त्यांनी ही पावले तातडीने उचलणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे. त्या याबाबत खोखर ओळख परेड करणार की झिरो पोलिसाच्या चोरीला साथ देणार ? यापैकी त्या कोणती भूमिका घेणार ? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

प्रभाग ७ व ८ मध्ये भाजपाची प्रचारफेरी उमेदवारांना जनसमर्थनाचा प्रचंड उत्साह.. मल्हार पाटील यांच्या नेतृत्वाखाली शक्तीप्रदर्शन

Next Post

धाराशिव नगर परिषद निवडणुकीतील प्रभाग क्र.१ मध्ये अपक्ष उमेदवार आकाश राम सहाणे यांचा भाजपला जाहीर पाठिंबा!

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेचा गांजा तस्करांना दणका!
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेचा गांजा तस्करांना दणका!

November 10, 2026
दिवाळीच्या सुट्टीत बंद घराला चोरट्यांचा डाव;
क्राईम

दिवाळीच्या सुट्टीत बंद घराला चोरट्यांचा डाव;

November 8, 2026
कळंब पत्नीच्या खुनातील फरार आरोपी जेरबंद
क्राईम

कळंब पत्नीच्या खुनातील फरार आरोपी जेरबंद

November 3, 2026
सुकटा मारहाण प्रकरणातील मुख्य फरार आरोपी जेरबंद
क्राईम

सुकटा मारहाण प्रकरणातील मुख्य फरार आरोपी जेरबंद

October 21, 2026
धाराशिव LCB ची धडाकेबाज कारवाई
क्राईम

धाराशिव LCB ची धडाकेबाज कारवाई

October 19, 2026
परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
Next Post

धाराशिव नगर परिषद निवडणुकीतील प्रभाग क्र.१ मध्ये अपक्ष उमेदवार आकाश राम सहाणे यांचा भाजपला जाहीर पाठिंबा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

दुय्यम न्यायालयीन कर्मचारी संपावर!

दुय्यम न्यायालयीन कर्मचारी संपावर!

November 14, 2026
गोरोबा काकांच्या पालखीचे swagat

गोरोबा काकांच्या पालखीचे swagat

November 14, 2026
नीरा–भीमा, जेऊर बोगद्यांची कामे बंद!

नीरा–भीमा, जेऊर बोगद्यांची कामे बंद!

November 13, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!