• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

शेतकरी बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही
सर्व निकष बाजूला ठेवून सरसकट मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 24, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS


शेतकरी बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही
सर्व निकष बाजूला ठेवून सरसकट मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती


अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. त्यामुळे मदतही अभूतपूर्वच असायला हवी अशी आग्रही मागणी आपण मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार सगळे निकष बाजूला सारून सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात येईल, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी बुधवारी उजनी (ता. औसा, जि. लातूर) येथे केली आहे. अभूतपूर्व संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेमुळे मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बुधवारी दुपारी औसा येथील हेलिपॅडवर आगमन झाले. तेथून त्यांनी मोटारीने उजनी गाठली.  सोबत मित्रचे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजितसिंह पाटील होते. १२ सप्टेंबर रोजी रात्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे उजनीला पाण्याचा वेढा पडला होता. दुसऱ्याच दिवशी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उजनीला भेट देऊन पाहणी केली होती. त्यांनंतर आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना मराठवाड्यावर ओढवलेल्या आपत्तीबाबत माहिती दिली होती.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी सोलापूर जिल्ह्यातील काही भागांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर ते औसा परिसरातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. उजनीत पाहणी केल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रासह मराठवाडा, लातूर, धाराशिव जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला आणि ते पाणी शेतांमध्ये शिरल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जमीन खरडून गेली. घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे धान्यासह संसारोपयोगी साहित्याचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळेच आपण स्वतः पाहणी करण्यासाठी येथे आलो असल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी नमूद केल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, की ही परिस्थिती पाहूनच शासन म्हणून मी आपल्याला आश्वस्त करतो, की सर्व निकष बाजूला सारून सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेल्या या जाहीर  घोषणेचे उपस्थित असलेल्या शेतकरी बांधवांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. टंचाईच्या परिस्थिती ज्या उपाययोजना केल्या जातात, तशाच उपाययोजना आता करण्यात येतील. ज्यांच्या घरांचे, दुकानांचे नुकसान झाले आहे, त्यांनाही मदत केली जाणार असल्याचे सांगत त्यासाठी मदतीचा २३०० कोटींचा पहिला हप्ता कालच जारी करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे. आता या नुकसानीची पाहणी झाल्यानंतर तातडीने ही मदत केली जाईल. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही, असे त्यांनी पुन्हा एकदा आवर्जून नमूद केल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले.

यावेळी लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार अभिमन्यू पवार, आमदार संजय बनसोडे, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadआपत्ती व्यवस्थापनआपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनआपत्तीग्रस्त शेतकरीकर्जमाफी अतिवृष्टी अनुदान मदतकार्य आमदार खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकशेतकरी कर्जमाफी
Previous Post

धाराशिव पुरस्थितीचा आढावा…मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत पाण्यात उतरून पाहणी करणाऱ्या पोलीस अधीक्षक रितू खोखर चर्चेत

Next Post

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करून दिला धीर… आनंद (तात्या) पाटील यांची शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी व मदतीची मागणी

Related Posts

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक
कृषी

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक

August 17, 2026
मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील
कृषी

मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील

July 23, 2026
शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील
कृषी

शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील

July 11, 2026
“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”
कृषी

“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”

July 7, 2026
गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश
कृषी

गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश

July 4, 2026
ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील
कृषी

ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील

June 5, 2026
Next Post

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करून दिला धीर... आनंद (तात्या) पाटील यांची शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी व मदतीची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

August 31, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!