तेरणा जलशुद्धीकरण केंद्रातील दररोजची ३ लाख लिटर पाण्याची गळती रोखली; दुष्काळात धाराशिवकरांना दिलासा देण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचा पुढाकार!
दुष्काळात धाराशिव शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून सभापती विलास लोंढे यांचे अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याचे निर्देश!
धाराशिव | लोकविचारदुष्काळाची तीव्रता लक्षात घेता धाराशिव शहरातील नागरिकांना सुरळीत, वेळेवर आणि शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नगरपरिषद प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील व भाजपा नेते मल्हार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्षा सौ. नेहा राहुल काकडे यांच्या सूचनेनुसार पाणीपुरवठा सभापती विलास (बापू) लोंढे यांनी अधिकाऱ्यांसमवेत तेरणा पाणी शुद्धीकरण केंद्राची पाहणी केली.
या पाहणीदरम्यान जलशुद्धीकरण केंद्रात दररोज जवळपास ३ लाख लिटर पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आले. यापूर्वी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या केंद्राची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार संबंधित वॉलचे काम पूर्ण करून पाण्याची गळती बंद करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असल्याने ही गळती रोखल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होणार आहे.
यावेळी पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे यांनी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच नागरिकांना वेळेवर आणि शुद्ध पाणी मिळेल, यासाठी पाणीपुरवठा यंत्रणेवर नियमित लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले.
यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रोहित मुंढे, विद्युत अभियंता सिद्धार्थ मोरे, ठेकेदार राजाभाऊ पवार, ठेकेदार संजय मोरे आणि कन्सल्टंट सतीश राठोड उपस्थित होते.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











