• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

गोरोबा काकांच्या पालखीचे swagat

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
November 14, 2026
in सामाजिक
0
गोरोबा काकांच्या पालखीचे swagat
0
SHARES
120
VIEWS

अनेक वर्षांनंतर पालखी स्वागताचा प्रथम मान नगराध्यक्ष सौ. नेहा राहुल काकडे यांना; भाजपा नगरसेवकांकडून गोरोबा काकांच्या पालखीचे भक्तिभावाने स्वागत!

‘संत येती घरा, तोचि दिवाळी-दसरा’; टाळ-मृदंगाच्या गजरात धाराशिव शहर न्हाऊन निघाले भक्तिरंगात!

धाराशिव | लोकविचार

‘संत येती घरा, तोचि दिवाळी-दसरा’ या उक्तीचा प्रत्यय धाराशिव शहरात संतश्रेष्ठ गोरोबा काका कुंभार यांच्या पालखी आगमनाने आला. श्रीक्षेत्र तेर येथून कार्तिकी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या संतश्रेष्ठ गोरोबा काका कुंभार यांच्या पायी दिंडीचे धाराशिव शहरात भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. यंदाच्या पालखी स्वागत सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, अनेक वर्षांनंतर धाराशिव नगरपरिषदेवर लोकनियुक्त नगराध्यक्ष विराजमान झाल्याने पालखी स्वागताचा प्रथम मान शहराच्या प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्ष सौ. नेहा राहुल काकडे यांना मिळाला.

वास्तविक, धाराशिव शहरात येणाऱ्या संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या पालखीचे स्वागत करण्याचा आणि पालखीचा प्रथम मान स्वीकारण्याचा पारंपरिक मान नगराध्यक्षांना दिला जातो. धाराशिव नगरीचे प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्ष पालखीचे स्वागत करतात, अशी पूर्वापार परंपरा आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून नगरपरिषदेच्या निवडणुका न झाल्याने नगरपरिषदेवर प्रशासकीय राजवट होती. त्यामुळे या कालावधीत पालखी स्वागताचा मान नगराध्यक्षांऐवजी नगरपरिषद प्रशासनाला, म्हणजेच मुख्याधिकाऱ्यांना मिळत होता. मागील वर्षी नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर धाराशिवला लोकनियुक्त नगराध्यक्ष मिळाले. त्यामुळे अनेक वर्षांच्या खंडानंतर यंदा पालखी स्वागताचा पारंपरिक प्रथम मान पुन्हा शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या नगराध्यक्ष सौ. नेहा राहुल काकडे यांना मिळाला. त्यामुळे यंदाच्या पालखी स्वागत सोहळ्याला विशेष ऐतिहासिक आणि पारंपरिक महत्त्व प्राप्त झाले.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नगराध्यक्ष नेहा काकडे आणि भाजपा नगरसेवकांच्या वतीने पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष नेहा काकडे यांनी पालखीची आरती करून संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. यावेळी टाळ-मृदंगाचा गजर, विठ्ठलनामाचा जयघोष आणि वारकऱ्यांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर भक्तिरंगात रंगून गेला.

यानंतर संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या पालखीची जुन्या धाराशिव शहरातून पारंपरिक नगरपरिक्रमा झाली. शहरातील विविध भागांत नागरिकांनी रांगोळ्या काढून, फुलांची उधळण करीत तसेच आरती ओवाळून पालखीचे स्वागत केले. ठिकठिकाणी वारकऱ्यांचे आदरातिथ्य करण्यात आले.

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा, या भावनेतून धाराशिवकरांनी पालखी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या भक्ती, श्रमप्रतिष्ठा आणि समर्पणाचा संदेश देणारा हा सोहळा शहरवासीयांसाठी श्रद्धा, भक्ती आणि आनंदाची पर्वणी ठरला.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकरिंगणवारकरीविठ्ठल रखुमाई मंदिर पंढरपूरसंत गजानन महाराजसंत तुकाराम महाराजसंतश्रेष्ठ गोरोबा काका पालखी
Previous Post

नीरा–भीमा, जेऊर बोगद्यांची कामे बंद!

Next Post

दुय्यम न्यायालयीन कर्मचारी संपावर!

Related Posts

प्रभाग २० मधील १२०० कुटुंबांची दिवाळी गोड;
सामाजिक

प्रभाग २० मधील १२०० कुटुंबांची दिवाळी गोड;

November 9, 2026
आमदार राणादादांचा वाढदिवसाचा कष्टकरी भटक्या / गरीब कुटुंबांसोबत साजरा
सामाजिक

आमदार राणादादांचा वाढदिवसाचा कष्टकरी भटक्या / गरीब कुटुंबांसोबत साजरा

October 30, 2026
प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;
सामाजिक

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;

September 10, 2026
ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
Next Post
दुय्यम न्यायालयीन कर्मचारी संपावर!

दुय्यम न्यायालयीन कर्मचारी संपावर!

ताज्या घडामोडी

आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

November 21, 2026
तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

November 20, 2026
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

November 19, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!