धाराशिवमध्ये ठाकरे गटाला धक्का! नगरसेविका ज्ञानेश्वरी राज निकम यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास; मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
धाराशिव लोकविचार
धाराशिव नगर परिषदेमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नगरसेविका सौ. ज्ञानेश्वरी राज निकम यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार राणाजगजितसिंह पाटील तसेच माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात होत असलेला विकास, भारतीय जनता पार्टीची विकासाभिमुख विचारधारा आणि जनसेवेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सुरू असलेले कार्य यावर विश्वास व्यक्त करत नगरसेविका ज्ञानेश्वरी राज निकम यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचे पक्षपरिवारात मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.
या पक्षप्रवेशावेळी राज निकम यांच्यासह त्यांचे सहकारी उपस्थित होते. धाराशिव शहरातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका ज्ञानेश्वरी निकम यांचा भाजप प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्यांच्या प्रवेशामुळे शहरातील भाजपच्या संघटनात्मक ताकदीत वाढ होणार असून, पक्षाला स्थानिक पातळीवर अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी नगरसेविका ज्ञानेश्वरी राज निकम यांच्या पक्ष प्रवेशामुळे धाराशिव शहरातील भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक ताकद निश्चितच अधिक वाढणार असल्याचे सांगितले. आगामी काळात शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी सर्वजण एकजुटीने कार्य करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नगरसेविका ज्ञानेश्वरी राज निकम यांच्या भाजप प्रवेशामुळे धाराशिव शहरातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडी घडण्याची शक्यता असून, आगामी काळात शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भाजपच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











