• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
October 14, 2026
in महाराष्ट्र
0
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
0
SHARES
3
VIEWS

शेतकऱ्यांची चेष्टा करू नका पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

शेतकऱ्यांची चेष्टा करू नका; हेक्टरी ५० हजारांची मदत द्या! आ. कैलास पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : “पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांनी दिवाळी कशी साजरी करायची, हे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी सांगावे. एक एकर सोयाबीन काढण्यासाठी पाच हजार रुपये मजुरी लागते. अशा परिस्थितीत पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जाहीर करून सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करीत आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याऐवजी दिवाळीपूर्वी हेक्टरी किमान ५० हजार रुपयांची भरीव मदत द्यावी,” अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.सह्याद्री अतिथिगृह येथे बुधवारी (१४ ऑक्टोबर) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याची घोषणा केली. या घोषणेवर आमदार कैलास पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारच्या मदतीच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.आमदार पाटील म्हणाले की, राज्य सरकारने २६ सप्टेंबर रोजी दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. जवळपास ८१ टक्के पंचनामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय पथकानेही पाहणी करून दुष्काळाची गंभीर परिस्थिती जाणून घेतली. एवढ्या सर्व प्रक्रिया झाल्यानंतरही सरकार अग्रीम मदतीची भाषा का करीत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.“दुष्काळ जाहीर झाला त्याच दिवशी मदत दिली असती, तर त्याला अग्रीम म्हणता आले असते. आता पंचनामे अंतिम टप्प्यात आले आहेत. केंद्रीय पथकाची पाहणी झाली आहे. तरीही सरकार पाच हजार रुपये अग्रीम देणार असे सांगत आहे. मग एवढे दिवस पंचनामे कशासाठी केले? शेतकऱ्यांना पूर्ण नुकसानभरपाई देण्यासाठी सरकार आणखी कशाची वाट पाहत आहे?” असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.पाच हजार रुपयांच्या मदतीवरून त्यांनी सरकारला थेट आव्हान दिले. “एक एकर सोयाबीन काढण्यासाठी पाच हजार रुपये मजुरी द्यावी लागते. खाद्यतेलाचा एक डबा खरेदी करायचा म्हटले तरी दोन हजार सातशे रुपये खर्च होतात. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी होणार? मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी पाच हजार रुपयांत दिवाळी साजरी करण्याचे गणित शेतकऱ्यांना समजावून सांगावे,” असे आव्हान त्यांनी दिले.सरकारकडून या मदतीचाही मोठा गाजावाजा केला जाईल आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड केल्याचे सांगितले जाईल. मात्र, प्रत्यक्षात शेतकरी आर्थिक संकटात असताना एवढ्या तुटपुंज्या रकमेतून त्यांची दिवाळी गोड होऊ शकत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीची वाट पाहणार नाही, असे राज्य सरकारने यापूर्वी जाहीर केले होते. मग आता केंद्र सरकारकडून मदत मिळण्याची प्रतीक्षा का केली जात आहे, असा सवाल करत पाटील म्हणाले की, राज्यात आणि केंद्रात एकाच विचाराचे सरकार असल्याचे सातत्याने सांगितले जाते. मग केंद्र सरकारकडून पुरेशी मदत मिळवण्यात अडचण काय आहे? शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारली पाहिजे.दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले आहे. यापूर्वी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले, तर यंदा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. आता रब्बीच्या पेरणीचीही शक्यता अत्यंत कमी आहे. अनेक भागांत रब्बीची पेरणीच होणार नसल्याने पुढील हंगामातून उत्पन्न मिळण्याची आशाही मावळत आहे. अशा गंभीर परिस्थितीत सरकारने जुन्या मदतनिकषांच्या चौकटीत न अडकता शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विचारात घेऊन नुकसानभरपाई निश्चित केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.“शेतकऱ्यांनी आधीच पेरणी, बियाणे, खते, मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च केला आहे. पीक हातचे गेल्याने त्यांच्याकडे देणी फेडण्यासाठीही पैसे नाहीत. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हेक्टरी किमान ५० हजार रुपये मिळाले, तरच ते काही प्रमाणात आपली देणी भागवून दिवाळी साजरी करू शकतील. पाच हजार रुपयांच्या मदतीने त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत,” असे पाटील यांनी स्पष्ट केले.दुष्काळी मदत लवकरच जाहीर करू, या सरकारच्या भूमिकेवरही त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. “लवकरच म्हणजे नेमके कधी? त्यासाठी सरकार कोणता मुहूर्त शोधत आहे? शेतकरी रोज संकटाशी झुंज देत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे गंभीर वास्तव समोर असताना सरकार केवळ लवकरच मदत करू, सकारात्मक निर्णय घेऊ, असे सांगत आहे. आणखी किती दिवस शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करायची?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.ई-पीक पाहणी झालेली असतानाही शेतकऱ्यांना पुन्हा छायाचित्रे आणि कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले. त्यासाठी शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा खर्च झाला. पंचनामे झाले, मंत्र्यांचे दौरे झाले आणि केंद्रीय पथकाचीही पाहणी झाली. तरीही मदत देण्यासाठी आणखी कोणती प्रक्रिया शिल्लक आहे, हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी पाटील यांनी केली.“सरकारला शेतकऱ्यांविषयी खरोखरच कळवळा असेल, थोडी तरी संवेदना शिल्लक असेल, तर दिवाळीपूर्वी भरीव नुकसानभरपाई द्यावी. केवळ पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाल्याचा दावा करू नये. पंचनामे आणि पाहण्यांच्या नावाखाली वेळ घालवण्याऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष मदत जमा करावी,” अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली.

Lokvichar – लोकविचार Kailas Patil – कैलास पाटील

Tags: dharashiv collectorLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
Next Post
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!