• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

खरीप नुकसानीची शास्त्रीय पाहणी सुरू;

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
September 5, 2026
in कृषी
0
खरीप नुकसानीची शास्त्रीय पाहणी सुरू;
0
SHARES
8
VIEWS

खरीप नुकसानीची शास्त्रीय पाहणी सुरू; आठवडाभरात जिल्हास्तरीय अहवाल शासनाकडे — आ. राणाजगजितसिंह पाटील

वाशी, तुळजापूर तालुक्यात तज्ज्ञ, कृषी व महसूल पथकांकडून प्रत्यक्ष पाहणी; पीक कापणी प्रयोग सप्टेंबरमध्येच घेण्याची मागणीधाराशिव लोकविचार जिल्ह्यात पावसातील मोठ्या खंडामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून ठोस मदत मिळावी यासाठी आता नुकसानीची शास्त्रीय व वस्तुनिष्ठ पाहणी सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कृषी व महसूल विभागाच्या पथकाने शनिवारी वाशी तालुक्यातील तेरखेडा तसेच तुळजापूर तालुक्यातील इटकळ परिसरातील शेतांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली.

या पाहणीस आमदार राणाजगजितसिंह पाटील उपस्थित होते.पावसातील खंडामुळे पिकांची झालेली हानी, पिकांची सद्यस्थिती, नुकसानीची तीव्रता आणि संभाव्य उत्पादनातील घट याची तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष शेतात पाहणी करून नोंद घेण्यात आली.

नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे अहवालातून स्पष्ट झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाच्या निकषांनुसार मदतीच्या प्रक्रियेला गती मिळू शकते, अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली.जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात येणारा वस्तुनिष्ठ अहवाल आठवडाभरात शासनाकडे सादर होईल, यासाठी आपले जातीने लक्ष असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तेरखेडा, इटकळ येथे तज्ज्ञांकडून पाहणीतेरखेडा येथे कृषी विस्तार विद्यावेत्ता व कृषी विज्ञान केंद्र, आंबेजोगाई येथील सदस्य तथा शास्त्रज्ञ डॉ. अरुण गुट्टे, आयआयटी मुंबईचे तज्ज्ञ डॉ. हेमंत बेलसरे, डॉ. गोपाळ चव्हाण, असीम रामा परवीन यांच्यासह उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोलंगे, वाशीचे तालुका कृषी अधिकारी गणेश सूर्यवंशी, मंडळ अधिकारी, तलाठी, मंडळ कृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी सहभागी झाले.

इटकळ येथील पाहणीदरम्यान उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे, आयआयटी मुंबईचे आकाश राठोड व त्यांचे तज्ज्ञ पथक, कृषी विज्ञान केंद्र तुळजापूरचे शास्त्रज्ञ एस. एल. सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी के. जे. बचुटे, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे, प्रा. ए. बी. कसबे, डॉ. एस. एन. झगडे, एन. एस. हरवाडीकर, दयानंद गळवे आदी उपस्थित होते.

पीक कापणी प्रयोग सप्टेंबरमध्येच घेण्याची मागणीदरम्यान, नुकसान झालेली पिके अधिक काळ शेतात ठेवणे शेतकऱ्यांना शक्य नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी काढणीला सुरुवात केली आहे.

धाराशिव जिल्ह्यात पीक कापणी प्रयोग ऑक्टोबरमध्ये प्रस्तावित आहेत. मात्र, तोपर्यंत नुकसानग्रस्त शेतांमध्ये पीक शिल्लक राहण्याची शक्यता कमी आहे.यामुळे निश्चित केलेल्या प्लॉटवर पीक उपलब्ध नसल्यास प्रत्यक्ष उत्पादनातील घट निश्चित करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात आणि पात्र शेतकरी पीक विमा किंवा शासनाच्या नुकसानभरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पीक कापणी प्रयोग ऑक्टोबरऐवजी सप्टेंबरमध्येच घेण्यात यावेत, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कृषी आयुक्तांकडे केली आहे.

कृषी आयुक्तांनी महसूल विभाग व संबंधित विमा कंपन्यांशी तातडीने चर्चा करून सप्टेंबरमध्येच पीक कापणी प्रयोग घेण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.प्रत्येक महसूल मंडळात १२ प्लॉट निश्चितजिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळात प्रत्येक पिकासाठी पीक कापणी प्रयोगाचे १२ प्लॉट निश्चित करण्यात आले आहेत. या प्लॉटची माहिती संबंधित कृषी अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त पीक काढण्यापूर्वी कृषी विभागाशी संपर्क साधून आपल्या गावातील निश्चित प्लॉटची माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तेरखेडा येथे भाजपचे तालुका उपाध्यक्ष सुधीर घोलप, प्रवीण घुले, माजी ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर सारूक, भाजप नेते अरुण धालगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य मदन बारकुल, आदेश घुले यांच्यासह शेतकरी बालाजी घुले, मंगेश कडवकर, शिवाजी धुमाळ, बाबासाहेब घुले, उमाकांत मनगिरे, रुपेश उमरदंड आदी उपस्थित होते.इटकळ येथे जीप सभापती सिद्धू अण्णा कोरे, पंचायत समिती सभापती विक्रम देशमुख, बा.स. सभापती संतोष बोबडे, वसंतराव वडगावे, अरविंद पाटील, महादेव जाधव, रमेश पाटील, मल्लिनाथ गावडे, विलास राठोड, पद्माकर जेवळे आदी उपस्थित होते.

नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल वेळेत शासनाकडे सादर होऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहील, असा निर्धार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारosmanabadआमदार कैलास पाटीलतुळजापूर आमदार राणाजगजितसिंह पाटीलधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

गणेश मंडळांना विविध स्पर्धांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा

Next Post

खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन वृद्ध महिलेची लूट

Related Posts

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
कृषी

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

October 2, 2026
दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे
कृषी

दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे

September 26, 2026
जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;
कृषी

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;

September 26, 2026
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार
कृषी

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार

September 23, 2026
धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!
कृषी

धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!

September 22, 2026
पालकमंत्री प्रताप सरनाईक थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर
कृषी

पालकमंत्री प्रताप सरनाईक थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर

September 17, 2026
Next Post
खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन वृद्ध महिलेची लूट

खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन वृद्ध महिलेची लूट

ताज्या घडामोडी

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!