धाराशिवच्या विकासाला मिळणार गती; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची विकासकामांसाठी निधीची ग्वाही राहुल काकडे नगरसेवक
धाराशिव लोकविचार
धाराशिव शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भेट घेत परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत शहरातील विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या समवेत नगरसेवक राहुल हरिभाऊ काकडे यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन शहरातील प्रलंबित तसेच आगामी विकासकामांवर चर्चा केली..
या भेटीदरम्यान धाराशिव शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा यांसह आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांबाबत सकारात्मक चर्चा केली. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक विकासकामांना गती देण्याबाबतही यावेळी विचारविनिमय करण्यात आला.
धाराशिव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी महत्त्वपूर्ण ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली. त्यामुळे आगामी काळात शहरातील विविध विकासकामांना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सहकार्याने धाराशिव शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असून, विकासाच्या प्रत्येक कामासाठी सदैव कटिबद्ध राहू, अशी ग्वाही नगरसेवक राहुल काकडे यांनी दिली.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून निधीची सकारात्मक ग्वाही मिळाल्याने धाराशिव शहरातील आगामी विकासकामांना वेग मिळण्याची चिन्हे असून, शहराच्या विकासाचा वेग आता आणखी वाढणार असल्याचे चित्र आहे.
धाराशिव नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना व विकासकामे मार्गी लावण्याचा संकल्प असून, शहराच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे नगरसेवक राहुल हरिभाऊ काकडे यांनी सांगितले.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786










