• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

कळंब नगरसेवक मोहसीन सलीम मिर्झा ची ठाकरे गटातून हकालपट्टी

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 12, 2026
in क्राईम
0
कळंब नगरसेवक मोहसीन सलीम मिर्झा ची ठाकरे गटातून हकालपट्टी
0
SHARES
508
VIEWS

लोकविचार इम्पॅक्ट! कळंब नगरसेवक मोहसीन सलीम मिर्झा ची ठाकरे गटातून हकालपट्टी जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे-पाटील यांची तात्काळ कारवाई

कळंब | लोकविचार

परभणीतील ड्रग्ज कारवाईनंतर कळंबशी संबंधित नगरसेवकाचे नाव समोर आल्याच्या वृत्ताला ‘लोकविचार’ने दोन दिवसांपूर्वी प्रसिद्धी देत ठाकरे गटाच्या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित केला होता. या वृत्ताची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी संबंधित नगरसेवकाची पक्षातून तात्काळ हकालपट्टी केली आहे.

परभणी पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कारवाईत कळंबशी संबंधित मोहसीन सलीम मिर्झा याच्यावर कारवाई झाल्याची माहिती समोर आल्यानंतर कळंबमधील एमडी प्रकरण पुन्हा चर्चेत आले होते. मिर्झा हे ठाकरे गटाशी संबंधित नगरसेवक असल्याने पक्ष त्यांच्यावर कारवाई करणार की पाठीशी घालणार? असा सवाल ‘लोकविचार’ने उपस्थित केला होता.

तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरणात पक्षाचे आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे कळंबशी संबंधित नगरसेवकावर कारवाईची माहिती समोर आल्यानंतर पक्षाची भूमिका काय राहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

‘लोकविचार’च्या वृत्तानंतर या प्रश्नाला आता स्पष्ट उत्तर मिळाले असून, जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी संबंधित नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे ‘लोकविचार’ने उपस्थित केलेल्या प्रश्नावर ठाकरे गटाने तात्काळ निर्णय घेतला आहे.

दरम्यान, परभणीतील कारवाई आणि कळंबमधील एमडी प्रकरणाचा परस्पर काही संबंध आहे का, हे अद्याप तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे. संबंधित व्यक्तीवरील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणेही आवश्यक आहे. मात्र, पक्षाशी संबंधित व्यक्तीवर झालेल्या पोलिस कारवाईनंतर पक्षाने घेतलेल्या तात्काळ निर्णयामुळे राजकीय वर्तुळातही या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.

एकीकडे ड्रग्जविरोधात आक्रमक भूमिका आणि दुसरीकडे पक्षाशी संबंधित नगरसेवकावर कारवाई—‘लोकविचार’ने उपस्थित केलेल्या प्रश्नाची दखल घेत ठाकरे गटाने घेतलेल्या निर्णयामुळे ‘लोकविचार इम्पॅक्ट’ पुन्हा चर्चेत आला आहे.

लोकविचार — सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabaddrugsअमली पदार्थआमदार कैलास पाटीलउस्मानाबादकळंब नगर परिषदधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

‘माऊली’ प्रकरणावर प्रशासन गप्प?१४ ऑगस्टला आमरण उपोषण

Next Post

समर्थ नगरातील अपूर्ण रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा

Related Posts

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ
क्राईम

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
क्राईम

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;
क्राईम

मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;

August 25, 2026
चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

August 25, 2026
गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे
क्राईम

गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे

August 24, 2026
नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ
क्राईम

नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ

August 24, 2026
Next Post
समर्थ नगरातील अपूर्ण रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा

समर्थ नगरातील अपूर्ण रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!