• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

रिन्यू एनर्जी कंपनीची शेतकऱ्यांवर दडपशाही!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 6, 2026
in क्राईम
0
रिन्यू एनर्जी कंपनीची शेतकऱ्यांवर दडपशाही!
0
SHARES
75
VIEWS

“रिन्यू एनर्जी कंपनीची शेतकऱ्यांवर दडपशाही! ऊस उभा असतानाच जबरदस्तीने टॉवर उभारणी; विरोध करणाऱ्या कुटुंबाला मारहाण! कारवाईची मागणी”

धाराशिव लोकविचार 

धाराशिव तालुक्यातील कनगरा येथील महिला शेतकरी छाया सोमनाथ तिघाडे यांच्या शेतात उभ्या उसाच्या पिकात जबरदस्तीने वीजवाहिनीचा टॉवर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप मे. रिन्यू ग्रीन एनर्जी सोल्युशन प्रा. लि. कंपनीवर करण्यात आला आहे. या बेकायदेशीर कामाला विरोध केल्यामुळे कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकरी कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला असून, संबंधित टॉवरचे काम तात्काळ थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पीडित शेतकरी छाया सोमनाथ तिघाडे यांच्या नावावर कनगरा येथील गट क्रमांक १७१ मध्ये १ हेक्टर २१ आर क्षेत्राची शेती आहे. या शेतामध्ये मोठ्या मेहनतीने ऊस पिकविण्यात आला असून, त्याच शेतातून वीजवाहिनी नेण्यासाठी मे. रिन्यू ग्रीन एनर्जी सोल्युशन प्रा. लि. कंपनीने अधिकारपत्रधारक प्रतिनिधी चंदन शर्मा यांच्या माध्यमातून टॉवर उभारणीचे काम सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही स्पष्ट संमती न घेता कंपनीने टॉवर उभारणीसाठी लागणारे साहित्य थेट शेतात आणून टाकले. एवढेच नव्हे तर उभ्या उसाच्या पिकामध्ये मोठमोठे खड्डे खोदून पिकाचे नुकसान करण्यात आले. याबाबत जाब विचारत काम थांबविण्याची विनंती केली असता, कंपनीच्या संबंधितांकडून शेतकरी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

या घटनेत आणखी धक्कादायक बाब म्हणजे, संरक्षण मिळण्याऐवजी बेंबळी पोलिसांनीही शेतकरी कुटुंबालाच मारहाण करून त्यांना पोलीस ठाण्यात डांबून ठेवले, तसेच त्यांच्याकडील मोबाईल फोनही हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली आहे.

उभ्या पिकात बळजबरीने टॉवर उभारल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून भविष्यात शेती करणेही कठीण होईल, अशी भीती तिघाडे कुटुंबाने व्यक्त केली आहे. त्यामुळे उभ्या उसाच्या शेतात सुरू असलेले खोदकाम आणि टॉवर उभारणीचे काम तात्काळ रद्द करून संबंधित कंपनीच्या अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी छाया तिघाडे यांचे पती सोमनाथ तिघाडे तसेच रामेश्वर आणि श्रीकृष्ण सोमनाथ तिघाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीवरील हक्क, संमतीशिवाय सुरू होणारी कामे आणि अशा प्रकल्पांमुळे होणारे नुकसान या मुद्द्यांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जिल्हा प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपवनचक्कीपालकमंत्री प्रतापराव सरनाईक
Previous Post

कळंब ड्रग्ज प्रकरणात मोठा गौप्यस्फोट?

Next Post

तुळजापूरला आवाज उठवणारे लोकप्रतिनिधी कळंबच्या ड्रग्ज प्रकरणात गप्प का?

Related Posts

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला
क्राईम

मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

September 24, 2026
Next Post
तुळजापूरला आवाज उठवणारे लोकप्रतिनिधी कळंबच्या ड्रग्ज प्रकरणात गप्प का?

तुळजापूरला आवाज उठवणारे लोकप्रतिनिधी कळंबच्या ड्रग्ज प्रकरणात गप्प का?

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!